पान:मजूर.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर शिवाय मी त्यांना तुझ्या देखतच तुला घेऊन जाणार आहे म्हणून सांगि तलें नाहीं का ? त्यांनीं पण कालच परवानगी देऊन ठेविली आहे ! संतुदादाच्या रागाची भीति बाळगते आहेस, पण त्यांना कर्धी रागावतां तरी येतें कां ? - मला नाहीं वाटत त्यांना रागावतां येत असेलसें ! " असे म्हणून दादाच्या नुसत्या आठवणीनेंच बबूताई हंसायला लागली ! चल ग चल लवकर ! भारीच बाई चिकट तुझा स्वभाव! तू माझी मैत्रिण नसतीस तर अस्सा तुझा मला राग आला असता-" 66 " ताई, येतें मी. पण मला सांग, माझ्याबद्दल इतकें तुला हें कां वाटतें ?" मी विचारलें. “ कां म्हणजे ? माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ! " 66 काय माझ्यावर तुझें प्रेम ? " आश्चर्य वाटल्यासारखें करून मी पुन्हां तेंच विचारलें. " हो तुझ्यावर माझें प्रेम आहे ! म्हणून तर इतकें हैं सगळें बबूताई रडकुंडीस आली. " अरेरे ! " मी उद्गारले " मग मोठी वाईट गोष्ट झाली ! ” " “ ती कशाची ? ” बबूताईनें रंजीस येऊन विचारलें. " अग तुझें प्रेम अगीं अनाठायीं जडलें ! आपल्या दोघींत कुणच पुरुष नाहीं ! तूं किंवा मी पुरुष असतें तर तुझ्या प्रेमाचें सार्थक तरी झालें असतें ! " 66 " ' संतुदादाचच बहीण तूं ! ” बब्रूताई चेहरा खुलून येऊन म्हणाली. तूं असें कांहीं तरी बोलायचें नाहीं तर कुणी १ - रत्नु, चल, माझ्या मोटारीत बसून तुला यायचें आहे ना ?- चल जाऊन बैस अगोदर ! " मी रत्नुला घेऊन बबूताई बरोबर तिच्या मोटारींत जाऊन बसलें जातां जातांच घाईनें खाली दत्तासाहेबांच्या माणसाला " मी बाहेर जातें आहें परत येईपर्यंत आईची एक दोन वेळा चौकशी करा ' असे सांगून ठेविलें. मी निघालों हें पाहून बबूताईला कोण आनंद झाला ! मोटारींत बसायला मिळाले म्हणून रत्नुला तर किती मजा वाटत होती ! मोटारीत सारखा नाचायला लागला होता तो. त्याला आवरतां आवरतां पुरे वाट झाली आज आम्ही नव्या ताईच्या मोटारींत बसलों ! " याचेंच 66 मला.