पान:मजूर.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रुपया ठेवण्यांत आली आहे. प्रवेश फी भरल्यापासून पुढे प्रसिद्ध होणारें मालेचें पुस्तक या नियमाप्रमाणे पाऊणपट किंमतीत मिळेल. मालेच्या कोणत्याही पुस्तकाची किंमत एक रुपायाहून कधींच अधिक अस- णार नाहीं.
 ५." मजूर " ही मालेची पहिली कादंबरी आहे. या पुस्तकावरून मालेचे अंतर्बाह्यांग कोणत्या प्रकारचें आहे, याची मालेच्या आश्रयदात्यांस पूर्ण कल्पना येईल.
 ६ मालेचें हें ' मजूर ' पुस्तक शके १८४७ चैत्र शुद्ध प्रतिपदेस ( ता. २५ मार्च १९२५ इ. या दिवशी ) प्रसिद्ध होईल.
 ७ वर्गणीदाराने मालेचें एकादें पुस्तक नाकारल्यास यादींतून त्याचें नांव काढण्यांत येईल. आणि फिरून बारा आणे भरल्याखेरीज वर्गणीदार समजले जाणार नाहीं.
 ८ ज्यांना मालेचे वर्गणीदार व्हावयाचे असेल त्यांना येत्या वर्ष प्रति- पदेपर्यंत प्रवेश फीचा रुपया भरण्याची अवश्यकता नाहीं. ही विशेष सवलत ठेवण्यांत आली आहे. आज नुसतीं नांवें नोंदवावीत. मालेचें पहिलें पुस्तक निघाल्यानंतर ही सवलत रद्द आहे.
 ९ मालेच्या कायम वर्गणीदारांखेरीज इतरांस मालेचीं पुस्तकें मिळ- तील, त्यांस पुस्तकाची भर किंमत पडेल.
 १० मालेचे मुख्य संपादक, सुप्रसिद्ध ' माईसाहेब ' नाटकाचे कर्ते रा. रा. नारायण विनायक कुळकर्णी, हे असून, पहिली 'मजूर' कादं- बरी त्यांच्याच ओजस्वी लेखणीतून उतरली आहे. मार्लेत मालेच्या ध्येयाला साजतील अशा इतर विद्वान्, प्रतीभावान्, लेखकांच्या कादंब-या मालेच्या संपादक व सल्लागार मंडळांकडून पसंत करवून प्रसिद्ध कराव- याच्या आहेत.
 ११ मालेशी पत्रव्यवहार करावयाचा पत्ता रा. रा. विठ्ठल रामचंद्र खाडिलकर ' मालक श्री दत्त एजन्सी, ' ३९१ नारायण पेठ पुणे शहर " हा आहे.