पान:मजूर.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
मजूर

होता ! माझ्याशी मॅनेजरचें कालचें वर्तन मी शक्य तितकें जसेंच्या तसें जरी दादाला सांगितलें होतें, तरी प्रत्यक्ष माझ्या बाबतींत काढलेले हिडीस उद्गार मला दादाला जसेच्या तसे सांगतां आले नव्हते ! त्यामुळे काल म्हटल्याप्रमाणें मॅनेजर आमच्या घरीं ' येतों ' म्हटल्याप्रमाणें ' येईलच ' मला किंवा दादाला मात्र त्याला प्रत्यक्ष दारांत पाहीपर्यंत वाटलें नव्हतें ! इतका वेळ आमच्या यथे यऊन झाला, तरी कालच्या- प्रमाणे हवें तसें बोलण्याची, माझी चौकशी करण्याची, माझ्याशीं बोल- ण्याचा कोडगेपणा करण्याची त्याची तयारी दिसली नाहीं. कदाचित् दादाला ऑफिसांत महत्त्वाचें कांहीं सांगावयाचें आहे म्हणाला, तें माझ्याच संबंधानें असेल ! तो अधिकारलोलूप, निगरगट्टमनाचा, कठोर, व निर्लज्ज वृत्तीचा होता खरा, पण त्याचबरोबर ईश्वराने त्याच्याजवळ त्याला अगदीं विसंगत खोलपणा, व स्वार्थाची दूरदृष्टी ही बहाल केली होती. आणि त्याच कांहीं गुणांवर तो आज एका गिरणीचा मॅनेजर म्हणून मिरवीत होता. असे म्हटल्यास माझी कल्पना अगदीच चुकली असें म्हणतां यावयाचें नाहीं. दादाच्या हें लक्षांत आलें होतें. दादानें माझ्याकडे पाहिलें, मीं दादाकडे पाहिलें ! मॅनेजरचा फेरा आमच्याकडे वळण्यांतला हेतु दोघांच्याही ध्यानांत आल्याचें दोघांना कळले. आम्हां दोघांलाही थोडेसे हंसू आल्याखेरीज राहिलें नाहीं. पण मॅनेजराच्या लक्षांत आमच्या हंसण्याचें कारण येऊं नये, म्हणून आम्हीं दोघेही आमच्या हंसण्याचा संबंध आमच्या रत्नुच्या त्या वेळच्या भित्र्या अवस्थे- कडे जोडला !
 दादाचे जेवण झालें ! दादाने घाईघाईनें कपडे चढविले ! - आई नुकतीच तोंड धुवून औषध घेत बसली होती. नित्याप्रमाणें बाहेर जातांना आईला दादाने नमस्कार केला. मलाही थोडेसें 66 खडसूनच कालच्या- प्रमाणें आईला धांद्रटासारखें सोडून बाहेर कुठे जाऊं नकोस !" म्हणून सांगितलें, आणि 'चला साहेब, आज माझ्याकरितां फार तसदी घेत- लीत, आमच्यावर आज वाजवीपेक्षां जास्त मेहेरबानी दाखविलीत. आमच्या सारख्यांनी आपले हे उपकार केव्हां कुठें फेडावयाचे १" वगैरे म्हणत मॅनेजरला घराच्या बाहेर निघायला भाग पाडलें ! मॅनेजर माझ्याविषयीं