पान:मजूर.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वें .

५७


बोलावयाची अनुकूल संधि पाहत होता. ती दादाच्या माझ्या विषयींच्या बोलण्यानें त्याला आलीशी वाटली, आणि ती त्याने साधलीही !
 संतू, हीच तुझी सिस्टर काल मिलमध्यें तुला बोलवायला आणि आई आजारी आहे म्हणून सांगायला आली होती. काल हिने सांगेपर्यंत तुला कोणी आई-बहिण आहे हेंही मला माहित नव्हतें ! Oh, Your sister is very cleaver and sweet! I liked her very much ! हो, पण संतू Excuse me अं. मी हिला न ओळखल्या- मुळे कांहीं तरी भलतेच माझ्या नेहमींच्या फटकळ स्वभावाप्रमाणे बोलून गेलो. तिनें सांगितलें असेलच ! Don't be angree for that. Forget and Forgive ! मी थोडासा वाजवीपेक्षां जास्त स्पष्ट आणि फटकळ आहे --"
 "नेव्हरमाईंड ! त्याबद्दल काय विशेष ! आपल्या कालच्या दोनचार शब्दांवरूनच तिने ओळखले असले पाहिजे कीं-" दादा सांगू लागला- " काय ओळखलें ? काय ओळखलें ?” मॅनेजरला निराळीच आशा वाटून त्यानें मध्येंच विचारण्याची घाई केली ! -
 "दुसरें काय ओळखायचे ?" दादा बोलला ! " ब्रह्मदेव आपल्या जिभेला हाड घालायला विसरला हेंच - जाऊं द्या - चला ! साहेब चला ! - " दादा मॅनेजरला घेऊन बाहेर पडलाच ! दादाच्या शेवटच्या सांगण्यानें मॅनेजरचा चेहरा जवळजवळ फोटो काढून घेण्यासारखा झाला होता. पण काय करणार बिचारा ! आज तो मोठा मॅनेजर असला, दादावरचा सत्ताधीश असला, तरी त्याला दादाला खुष ठेऊन दादाकडून मला बायको म्हणून मिळवावयाची होती ! तेव्हां त्याकरितां तरी त्याला धोरण पाहूनच वागावयाचें होतें ! असो
 मॅनेजरचा फेरा माझ्याकरितां होता उघडच होतें. पण मला त्याचें कांहींच वाटलें नाहीं. मी त्याचा विचार केला नाहीं. कारणही पडलें नाहीं. दादा मात्र आज त्याच्याबरोबर त्याच्याच गाडीतून ऑफिसला गेला खरा !
 दादा गेल्यावर, मी जेवलें. आईला खायला घातलें. आज आईला किंचित् बरें वाटत होतें. कालच्यासारखी तल्खी वाटत नव्हती. तिच्या