पान:मजूर.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वें.

५५


मला सर्टिफिकेट मिळाले म्हणायचे ? याच सर्टिफिकेटाच्या आधारावर का मला हायग्रेड देत आहांत ! " दादा म्हणाला.
 "संतू, तुझी आई कुठे दिसत नाहीं ती ? - अजारी होती आहे ना? ती तर कुठेच दिसत नाहीं !” मॅनेजर नें कोणत्या कीं कारणानें पुन्हां आईची चौकशी चालविली. कदाचित् त्याच्या स्वैर जिभेला आणख कांहीं स्वैरपणा गाजविण्याची लहर लागली असावी कारण पुढे आपणच दांत विचकीत म्हणाली, " कां पाठविलीस कालच आईला सोनापूरला ? - हंः हः ! "
 "छे छे ! साहेब, आईची अजून तितकी तयारी नाहीं ! तिची इच्छा, अजून आपल्यासारख्या बड्या वड्यांचे फ्यूनरल सेरिमनी पहाण्याची आहे!” दादाने पण मॅनेजरच्या फटकळपणावर चांगलीच मात्रा दिली. तरी त्याला त्याचें कांहींच वाटलें नाहीं !
 दादाला मॅनेजराच्या आजच्या वर्तनाचा चमत्कारच वाटत होता. एवढा मोठा हुद्याचा माणूस माझ्याकडे कसा आला ? आला तो आला, इतका वेळ बसला आहे, अगदीं ऐसपैस बोलतो आहे, आपणही त्याच्या बाष्कळ बडबडीबद्दल चरचरीत व बिनदिक्कत डागण्या देत आहोत, तरी त्या निमूटपणे ऐकून घेत आहे, यांतलें इंगीत काय ? आपली शेटजीकडे रेकमेंडेशन केली म्हणतो, ऑफिसांत महत्त्वाच्या जागेवर न्यायचें बोलतो — गाडींतून अगदीं बरोबरीच्या नात्यानें वाग- विण्याची याची तयारी आज कां ? अशी कोणची एकदम यक्षिणीची- कांडी फिरली याच्या स्वभावावर याचा दादाला कांहीं उलगडा होत नव्हता ! पण किती झाला तरी दादा तो ! हलके हलके कालच्या दिव- साचा माझ्या बाबतीत झालेला त्याला इतिहास आठवला. आजची त्याची बसण्याची, बोलण्याची थोडासा नेहमींहून दादांचा अधिक उद्दा- मपणाही सोसून घेण्याची त्याची प्रवृत्ति व तन्हा दादाच्या ध्यानांत याव- याला वेळ लागला नाहीं ! मॅनेजरच्या मनाची दादाला आजवर अगदींच ओळख झाली नव्हती. असें नाहीं. पण यावेळी पहिल्या झटक्यासरशीं त्याच्या डोक्यांत वस्तुस्थितीचा प्रकाश पडला नाहीं, इतकी गोष्ट खरी ! पण त्याला दारांत पाहतांच माझ्या डोक्यांत मात्र चांगलाच उजेड पडला