पान:मजूर.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
मजूर


 “Certainly so ! " दादा उद्गारला. त्याने त्यावेळी आनंदाची कोण घाई दाखविली. झटकन् दादाने माझ्याकडे पाहिलें. आणि म्हणाला, " ताई खुळ्यासारखी चेहऱ्याकडे काय पहात राहिली आहेस? साहेबांना चहा-कॉफी-कोको -कांहीं तरी झटपट कर ! आटोप ! एवढें- सुद्धां का तुला सांगावें लागतें ? - साहेब, काय करूंद्या ? चहा म्हटलें-- चहा ! - कॉफी सांगितली, तर कॉफी, नाहीं तर कोको-आज सगळें आमच्या घरीं आहे !-वाजले किती पहा बरें ? - काय साडेनऊ ? - ताई, राहू दे नाहीं तर ! साहेब, आज तुम्हांला 'गिरणीत'च चहापार्टी देऊं !
 "चहापार्टीचे राहू दे तूर्त तू मोठा झालास म्हणून आम्हींच तुला लवकर जंगी चहापार्टी देऊं. " मजकडे पहात पहात मॅनेजर म्हणाले. "आणखी, संतू, आज तुझ्याबरोबर मला बरेंच महत्त्वाचें बोलायाचें आहे ! आपण तें ऑफिसांत बोलूं समजलास.
 "ठीक आहे ! " दादानेही सम्मति दिली. या वेळीं गप्प बसलेल्या मॅनेजरकडे टक लावून गर्भगळीत झालेल्या, आणि भीतीनें डोळ्यांत पाणी आणलेल्या रत्नुकडे दादाचें लक्ष गेलें.
 काय रे हैं ? रत्नु रडतोस कां ? आणि जेवत नाहींस तो ? साहेबांच्या- कडे कां लक्षपूर्वक पाहतो आहेस ? भ्याला आहेस की काय त्यांना ? त्यांना कांहीँ भ्यायचें कारण नाहीं ! अरे, ते आमच्या गिरणीचे साहेब आहेत, साहेब ! - तूं काय त्यांना बागुलबोवा समजलास होय ? कां इस्पिकचा एक्का ! का किलावरचा गुलाम ! - हा वेड्या, जेव मुकाट्यानें ! - साहेब, हा माझा धाकटा भाऊ ! भारी भित्रा आहे पहा ! तुमच्या सारख्याला तर भारी भितो. कोट, पाटलून, ती साहेबी टोपी पाहिली कीं लागलाच लपायला गुलाम ! त्यांतून तुम्हीं किडडिकीत असे उंच आहांत ना ? त्यामुळें साह- जीकच तो भिऊन गेला आहे ! – "
 अस्सें ? हा हा हा हा ! Don't fear ! Don't fear ! संतू, तुझा भाऊ, तुझ्यापेक्षां लबाड होणार हां ! " मॅनेजर आज कोणा- विषयींच कांहीं वाईट म्हणत नव्हता !
 म्हणजे साहेब, मी लबाड आहें वाटतें ? वा ! चांगलेच तुमचें हें