पान:मजूर.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वें .

५३


असते, हें पाहून मी तर आश्चर्यानें थक्कच झालों ! साहेब, माझी तर खात्री होऊन चुकली कीं, आपण जर इंग्लंडांत असतां, तर आपण मजुर पक्षाचे कैवारी, पुढारी म्हणून खात्रीनें सर राम्से मॅक्डोनाल्डच्या- ऐवजी तुम्हींच मिनिस्टरच्या जाग आला असता ! पण हिंदुस्थानासारख्या हीन देशांत तुमच्यासारख्या रत्नाला जन्माला घालून ईश्वरानें मिनि- स्टरच्या बाबतींत तुमच्या तोंडावर पालथा पायपोस मारला असें म्हणावें लागतें ! "
 “ हॅ: हॅ: हॅ: चालायचेच ! " दादाचा शालजोडींतला मॅनेजरला कळ- लाच नाहीं. फक्त मिनिस्टर होण्याच्या लायखीचे आपण आहोत, इत- केंच त्यानें ऐकिलें. आणि स्वारी तेवढ्यांतच गुंगली.  बाकीचे दादाचे शब्द मॅनेजरचे कान ऐकत होते, आणि डोळे व मन मला न्याहाळीत होतें !
 'बरोबर, बरोबर, संतू, तूं म्हणतोस तें बरोबर ! बाकी ब्रिटीश साम्राज्याचा नसलो, तरी इच्छारामभाई - मिलचा तरी मी मिनिस्टर आहेच कीं नाहीं ? झाले तर मग ! आपण आपले त्याच्यावरच संतुष्ट असावें !”
 "साहेबांचा महत्त्वाचा वेळ नाहीं का मोडत ? " दादा ब्याद टाळण्याकरितां खटपट करूं लागला. "माझें जेवण झालें, हातावर पाणी पडलें कीं निघतोंच ! "
 "छे छे ! वेळाचें काय विशेष ? - आपण बरोबरच जाऊं ! माझ्याच गाडींतून घेऊन जातों तुला. संतू तुला आतां मोठा माणूस-बडा अदमी करायचें ठरविले आहे मी ! काल रात्रीं इच्छारामभाईच्या बंगल्यावर मुद्दाम जाऊन तुझी स्पेशल रेकमेंडेशन केली आहे मी ! तुला आतां मोक- दमाच्या जाग्यावरून काढून वर ऑफिसांत, महत्त्वाचें आणि जबाब- दारीचें काम तुझ्यावर सोपवायचे आहे ! शेटजींची परवानगी घेऊन आलों आहें ! अरे, एवढेही करितां आलें नाहीं, तर मी गिरणीचा मॅनेजर- प्रधान कसला ? - काय समजलास ? - म्हटलें, तुझ्या आईच्या प्रकृतीची चौकशी करावी, ही आनंदाची बातमी सांगावी, आणि आज आपल्याच बरोबर आपल्या गाडींतून तुला घेऊन जावें ! - Don't you think this is a glad news?-"