पान:मजूर.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
मजूर


 "साहेबांची स्वारी कां- कशासाठीं इकडे फिरकली, आणि-' दादा पुढें घुटमळला.
 "आणि काय ? " मॅनेजरनें चौकशी चालविलीच !
 "साहेबांनी माझ्याकडे येऊन मला मोठेपणाला चढविल्याचे सांगितल्याबद्दल झालेला आनंद व्यक्त कसा करावा, हेंच मला समजेना ! "दादा उद्गारला.
 "नेव्हर माईंड ! " मॅनेजर दादाच्या त्याच वाक्यानें खुलून म्हणाले, " मी तुझ्या अजारी आईच्या समाचारासाठीं आलों आहें. तुझी आई काल अतिशय अजारी असल्याचें एकलें. कुठे आहे ती ? How is she now!-Where is she ? Is she alright ? - मला काल कळलें हें ! म्हणून मुद्दाम समाचारासाठीं आलों ! "
 Many many thanks for your kind favour. " दादाही त्यांचे आभार मानून मोकळा झाला.
 "बरें संतू, तुझ्या आईची खाणावळविणावळ नाहीं ना ? हो, नसली म्हणजे बरें. नाहींतर ती बिचारी अजारी, जेवायला येणारे त्रास द्यायचे, नाहीतर पैसे बुडवून जायचे ! - बहुतेक मजुरांच्या आया-बायका आपलें पोट बाहेर काढण्यासाठी छोट्या छोट्या खाणावळी घालतात, असें मला माहीत आहे, म्हणून तुला विचारतों. नाहीतर सध्यांच्या स्थितींत तो एक तुझ्यामागें त्रास ! " मॅनेजरनें मुक्ताफळे उधळलीं !
 "साहेब ! " दादा मॅनेजरकडे टक लावून बोलायला लागला. मला वाटलें दादा आतां काय बोलतो आहे, नी काय नाहीं ? असल्या घमेंड- खोर सत्ताधाऱ्यांना, दुसऱ्याच्या अंतःकरणाची, परिस्थितीची, शीलाची कल्पनाच असत नाहीं, म्हणून तोंडाला येईल तें बडबडतात ! आतांच्या बोलण्याचा मला जर इतका विलक्षण राग आला होता, तर दादाला किती आला असेल? पण त्या वेळेपुरता त्यानें तो राग गिळला. दुसरा एकादा दादाच्या ऐवजीं तिथे असता, तर असल्या अपमानकारक शब्दा- बद्दल त्यानें मॅनेजरचें टाळकेंच सडकलें असतें ! पण दादा अगदीं शांत- पणानें - गंभीरपणानें म्हणाला-
 "आम्हां मजुरांच्याबद्दल आपल्याला इतकी अपटुडेट इन्फरमेशन