पान:मजूर.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वे.

५१


 दादानें हें सांगण्यापूर्वीच मी तें सारें केलें होतें. शिवाय ट्रंक साधा- रण भिंतीलगतच ठेविली. मॅनेजर त्यावर बसले तरी त्यांना भिंतीला टेकायला यावें. या नवलपरीच्या खुर्चीवर मॅनेजर दादाच्या अत्याग्रहा- वरून बसले. न बसून सांगतात कुणाला ? नाइलाज होता, आमच्या- प्रमाणेंच त्याचाही. आपण होऊन अनाहूत त्यांतून ते आमच्या इथें आलेले, तेव्हां नाखुष झाले, तरी बोलणार कसे?
 छान ! संतू, तुझें डोकें देखील गढ्या मोठे कल्पक आहे !”
 त्या अभिनव खुर्चीवर बसल्यावर जणूं काय त्यांत आपल्याला कांहींच वाटलें नाहीं, असें दाखविण्याच्या उद्देशानें मॅनेजरनें हंसत हंसत बोलायला सुर- वात केली. बाकी मॅनेजरचा हंसरा चेहरा पाहतांनासुद्धां पाहून हंसाय- ला येण्यापेक्षां भीतिनें 'रामरक्षा' म्हणण्याची पाळी येण्यासारखी असे ! मॅने जरला पाहिल्यापासून रत्नुच्या तर तोंडांतला घांस तोंडांत, आणि हातांतला हातांतच अशी स्थिति झाली होती. मॅनेजरच्या आगतस्वागताच्या गड- बडींत आमचे कुणाचें त्याच्याकडे लक्षच गेलें नाहीं. मॅनेजरला पाहून रत्नुला तर खास वाटलें असावें कीं, तो दांडगाई करायला लागला, नीट जेवेना झोपायच्या वेळेला फार रडायला लागला म्हणजे त्याला गप्प करण्या- साठीं, वळणावर येण्यासाठीं, मी किंवा आई " बागुलबोवाची, भुतांची भीति घालीत असूं, तो बागुलबोवा, तें भूत मूर्तिमंत आलें कीं काय ? आणि कां ? आपण कांहीं रडलों नाहीं, कसलाही हट्ट घेतला नाहीं, मग आमच्या घरीं बागुलबोवा कां आला ?' असा विचार रत्नुच्या चिमुकल्या मनांत येणें कांहीं अशक्य नव्हतें ! मॅनेजरनीं तसल्याही खुर्चीींची स्तुति केली. दादा प्रथम प्रथम त्यांच्या 'होस हो ' देऊं लागला होताच. त्यामुळे खुशालचंदाला चढून जायला फारसा अवकाश लागला नाहीं !
 "वेल संतू, माझ्यासारखा मोठा माणूस तुझ्याकडे आल्याबद्दल, तुला, धन्यता, आणि मोठेपणा नाहीं वाटत ? " मॅनेजर मान ताठवून प्रौढीने म्हणाले !
 अलबत् ! कां नाहीं वाटणार ? " दादा उत्तरला,'पण "
 पण काय ? " मॅनेजरने विचारलें.