पान:मजूर.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टीने रंगविणें, हेच महाराष्ट्र - कुटुंब - मालेला मानवणारे आचार व विचार आहेत.
 महाराष्ट्राच्या मधल्या स्थितीनें आपल्याहून श्रेष्ठ, किंवा आपल्याहून कनिष्ठ स्थितीनें आपल्या बाबतींत काय काय चुका केल्या आहेत, याचें प्रदर्शन करण्याच्या मोहांत पडण्यापेक्षां, ही 'माला' मधल्या स्थितीची चूक किंवा दिशाभूल होत आहे, व थोड्याशा सत् प्रयत्नांनीं मधली स्थितीच कार्यक्षम व आदरणीय कशी होऊ शकेल; या प्रकारची कादं- बरी चित्रे - सादर करील.
 मालेची सेवा घेणे, तिजवर आपुलकीचें प्रेम ठेवणें, तिला रांगती चालती करण्यासाठीं, आस्थेनें हातभार लावणें, वगैरे गोष्टी महाराष्ट्रनिच उत्साहानें व तत्परतेनें करावयास पाहिजे आहेत.
 तरी मालेचा परामर्ष घेण्याची प्रत्येक महाराष्ट्रीयांस सविनय विनंती आहे.

सर्वोचा नम्र.


विठ्ठल रामचंद्र खाडिलकर.


मालक :- श्री दत्त एजन्सी, ३९१ नारायण पेठ


पुणे शहर.


महाराष्ट्र - कुटुंब - माला.
( नियमपत्रक.)

 १ महाराष्ट्र - कुटुंबाला सदभिरुचीपोषक होईल असें कादंबरी वाङ्मय प्रसिद्ध करणें हा 'माले'चा उद्देश आहे.
 २ वर्षातून चार पुस्तकें काढण्याचा संकल्प असून मालेचे कोणतेंही पुस्तक कर्मीत कमी १५० पासून जास्तीत जास्त २०० पानांचें असेल. ३ मालेचें कोणतेंही पुस्तक अंतरंगास शोभेसेंच बाह्यांगानें सुबक कर- ण्याची शिकस्त केली जाईल.
 ४ मालेचे कायम वर्गणीदार होणारांस मालेचें प्रत्येक पुस्तक किंम तीच्या पाऊण पटीनें मिळणार असून, मालेची प्रवेश फी फक्त एक