पान:मजूर.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वें.

४५


प्रमाणे घरीदारी सारी खादीच वापरी - आम्हांला वापरावयाला लावी. दादाच्या थोड्या पगाराला महात्माजींची खादी उपकारच झाली होती. घरांतल्या दिव्याला कांच लावावयाची झाली, तर ओगल्यांची ! आपल्या खेड्याचें नांगर कोणाचा घ्यावा म्हणून कोणाचें पत्र आलें तर त्याला याचे उत्तर जायचें " किर्लोस्कर नागरच " वापर. काड्याची पेटी कशी कां असेना, पण चितळ्यांची घ्यायची कुणी स्नेह्यांपैकीं त्याला लुगडीं आणायला सांगितली तर तींहि टिकेकरचीं अगर गजानन मिलचीं ! असा दादाचा अगदीं कटाक्ष झाला होता. तो म्हणे माझ्या कारखा- न्यांतील सावर माझ्या कारखान्यांतला कागद, हिंदुस्थानांतल्या यच्च- यावत् घरांतून घुसला पाहिजे !
 माझ्या संबंधानेही अशीच त्याची कांहीं तरी विलक्षण कल्पना होती. मी स्त्रीसमाज धुरीण झाले पाहिजे. मोठी थोरली लेखिका झाले पाहिजे, माझ्या हातून स्वदेश, स्वधर्म, समाज, यांच्या उन्नतीप्रीत्यर्थ सपाटून उत्तम प्रकारचें वाङ्मय निर्माण झालें पाहिजे. देशाला, स्त्रीपुरुषाला, उदयोन्मुख राष्ट्राला माझें वाङ्मय आदर्शवत् झाले पाहिजे ! थोडक्यांत म्हणजे मी कुणी तरी राष्ट्रकार्यधुरीण व्हावें. जशी दादाची इच्छा तशी मी होणार ही त्याची खात्रीच होतीं म्हणाना ?
 रत्नुबद्दल तर काय पुसायलाच नको ! रत्नु म्हणजे प्रति रत्नाकर होणार आहे. पूर्वीचे शिवाजी, बाजी, किंवा आजकालचे लोकमान्य, महा- त्माजी, लालाजी, रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोस, यांच्या मालिकेत रत्नाकरानें बसलें पाहिजे. आणि तो भावी आयुष्यांत स्वपराक्रमानें बस- णार, असा दादाचा रत्नुबद्दल आत्मविश्वास होता !
 दादाचीं नित्याची मनोराज्ये अशा प्रकारचीं असत ! - पण चालूं संसाराची परिस्थिती म्हणजे महिन्यांतून चार दोन दिवस तरी आम्हां सर्वाला अर्धपोटी राहण्याखेरीज भागत नव्हतें !-त्या चार पांच दिवसांत आमच्यांतला घांस घांस कमी करून आम्हीं रत्नुला मात्र उपाशी ठेवीत नसूं ! - अशा वेळी दादा म्हणे असे उपास तापास काढलेच पाहिजेत. एवढी तपश्चर्या झालीच पाहिजे. ब्रह्मपद मिळवायचे तर असे लोखंडाचे चणे चघळलेच पाहिजेत ! दादा आपल्या विचारांत गर्क झाला म्हणजे