पान:मजूर.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

44

मजूर


मनानें उपयोगी पडे ! त्यामुळे अलिकडे तर तो आपल्या गिरणीत - हाता खालच्या लोकांत फार फार आवडता झाला होता ! तो वरिष्ठाशीं अरे- रावीनें वागत नसे, तरी नमूनही वागत नसे, कामांत चुकारपणा, हयगय, आळस, दिरंगाई, कीं कसूर, करायची नाहीं; दुसऱ्यानें केलेली खपवून घ्यावयाची. नाहीं. नेहमी सगळ्याशी हंसत, या लोकांना हंसवीत, त्याचें काम चालावयाचें! दत्तासाहेबांला दादाचा हा बाणा पसंत पड़े ! आपल्या गिरणींतल्या मजुरांचे संघ स्थापावयाचे. रात्रीं निजण्याच्या अगोदर त्यांच्याच आवडत्या गोष्टी म्हणजे भजन करावयाला त्यांना उत्तेजन द्याव- याचे; त्यांतच देशस्थितीबद्दल त्यांना गोष्टी समजावून द्यावयाच्या, कोणाला साक्षर बनविण्याचा प्रयत्न करा, कोणी त्यांतच दारू, बाहेर ख्याली, यांचा नादी असेल तर कधीं गोड बोलून, कधीं कशाचे आमीष दाखवून, कधी धाक दपटशा घालून तर कधीं चार चौघांत त्याच्या व्यसनाबद्दल थट्टा करून- फजीती उडवून त्याला त्यापासून परावृत्त करा• वयाचें ! कधीं कोणाच्या पोटावर मारावयाचें नाहीं. कधीं कोणावरचा राग कायम ठेवावयाचा नाहीं. अशामुळे दादा गिरणबाबूंचा जीव की प्राण होऊन राहिला होता ! या कारणानें, दासांहबांसारख्या अनेक चांग- ल्यांच्या सहवासानें दादाच्या महत्वाकांक्षेला अंकुर फुटूं लागला होता ! तो कधीकधीं घरी रंगांत आला असतां आईजवळ बोलत बसला म्हणजे म्हणं, नी स्वदेशी मालाच्या गिरण्या माझ्या जिल्ह्यांत काढीन ! साखर, कागद, वगैरे तन्हेच्या गिरण्या काढीन ! किर्लोस्कर, ओगले, चितळे, टिकेकर, वेलणकर, वगैर मोठाले कारखाने काढणारी माणसे- माणसेच आहेत कीं नाहीं आमच्यासारखी ! त्यांनी कारखाने काढले, मला तसें का काढतां येणार नाहीं ? आजचा मजूर मी पुढे हजारों मजुरांचा पोशिंदा का होणार नाहीं ? खात्रीने होईन ! आणि आई तूच पाहशील ! अशा रीतीनें, स्वकियांच्या, स्वदेशाच्या, मी भावी आयुष्यांत उपयोगी पडेन. आणि बाबांच्या महत्त्वाकांक्षेला मधुर फळें आणून त्यांच्या उदरों जन्म घेतल्याचे सार्थक करून दाखवीन !"
 दादाची महत्वाकांक्षा जशी प्रगल्भ होत चालली होती, तसा त्यांच्या वर्तनक्रमांत ही फरक पडत चालला होता. तो महात्माजींच्या आज्ञ-