पान:मजूर.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
मजूर


माझा मराठी पांचवीपर्यंतचा अभ्यास करून घेतला होता. आम्हीं मुंब- ईला आल्यावर दादाने मला अभ्यास सोडायला लावला नाहीं. 'चंदा- रामजी हायस्कुलांत ' माझें नांव दाखल केलें. अनेक खटपटीलटपटी करून मला फ्रीशिप मिळवून दिली. माझा तेथें अभ्यास अगदीं निर्वेध चालला होता. सध्यां मी पांचव्या इयत्तेत होते. दादाला वाचायचा नाद सपाटून होता. इकडून तिकडून मिळतील ती पुस्तकें आणून वाचा- यचीं. मिळतील तितकीं, मराठी, इंग्रजी, हिन्दी, गुजराथी वर्तमानपत्र, मासिकें, वाचावयाची, आणि आपल्याबरोबर मलाही वाचावयाला लावावयाचीं. कित्येक वेळां मी वाचून आपण फक्त ऐकत असे. त्यामुळे मला आपोआपच चांगला वाचावयाचा नाद लागला होता. या वाच नाच्या योगानें स्वाभाविकच आजकालचें जग- देश, परदेश, स्वदेश- स्थिति, लोक, वगैरेबद्दल पुष्कळच कळावयाला लागलें होतें. स्वस्थिति ध्यानांत यावयाला लागून कोणत्या पद्धतीनें वागण्याचा क्रम ठेवला असतां कधीं काळीं आपली स्थिती सुधारण्यासारखी येईल. हे समजूं लागलें होतें.
 आम्हीं जेरमहालांत धोबीतलावावर तिसऱ्या मजल्यावर दत्तासाहेबांचे पोट भाडेकरी म्हणून राहिलों होतों, हें मागें एकदां आलेच आहे. दत्तासाहे- बांची आणि आमची गांठ अशीच कांहीं योगानें पडली. आम्हीं पहि- ल्यांदाच मुंबईला यायला निघालों होतों, त्यावेळी एकदम मुंबईला जाऊन उतरावयाचें कुठे हा आमच्यापुढे महत्वाचा प्रश्न होताच ! प्रथम आमच्या खेड्यांतील कांहीं मंडळी मुंबईस मजुरी करण्याकरितां राहिली होती, त्यांच्याकडे उतरावें, व चारदोन दिवसांत जशी सोय लागेल तशी करून घ्यावी, असें ठरविलें होतें. पण जेव्हां पुण्याला आम्ही मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसलों, तेव्हां कर्मधर्मसंयोगानें त्याच गाडींत आमच्या डब्यांत दत्तासाहेब चढले ! गाडी चालू झाल्यावर, दादा, व दत्तासाहेब यांच्यामध्यें, "तुम्ही कुठले, आम्हीं कुठले वगैरे मामुली विचारपूस झाली. हलके हलके बोलण्यावरून बोलणी निघून दादाकडून दत्तासाहेबांनी सविस्तर हकीकत काढून घेतली. दादाला पुष्कळ बोलायला पाहिजे. दत्तासाहेबांची तीच स्थिती!