पान:मजूर.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वें

४१


स्थिती नव्हती. बाबांच्या अकाली मृत्यूनें आज स्थितीला ती जमीन देखील कित्येक वेळा असून अडचण नसून खोळंबा अशी वाटे ! कारण एकादें वर्ष पाऊस पडला नाहीं, कीं त्या जमीनीचा खंड थके. आणि तिचा सरकारी सारा दादाला आपल्या पगारांतून साठवून मुंबईहून पाठवावा लागे !
 दादा मॅट्रिक झाला होता. त्याचेही शिक्षण थांबले. बांबांच्या पश्चात् बाबांच्या पावलांवर पाऊल टाकून निमण्यासारखें नव्हतें. म्हणून आईच्या सम्मतीनें आम्हां सर्वोना घेऊन नशीब काढण्याकरितां नव्हे तर पोटाच्या पाठीं लागून दादा मुंबईला आला ! मॅट्रिक माणसाला मनासा- रखी ती नौकरी कशी मिळणार ! चार दोन ठिकाणी नौकरीसाठीं गेला असतां " नकारघंटा' मिळून वर अपमानही सोसून घ्यावा लागला होता. एका ऑफिसांत तर दादाला एकानें म्हटलें " तुझ्यासारख्या लठ्ठेभारतीला कारकुनी पेशाची नौकरी हवी आहे कशाला ? शरीर कष्ट करून गोदी- गिरण्यांतून हमाली करशील तर काय बिघडेल ? - मजुरी करायला तुला लाज वाटते कीं काय ? -" यानंतर दादा नौकरी हुड- कायला कुठेही गेला नाहीं. 'आम्हीं मजूर - आम्हांला मजुरीच केली पाहिजे, पोटासाठी मजुरी करायला कुणाची लाज ? नशीबी असेल तर मजुरी करूनच मोठें नाहीं का होतां येणार ?' असें ठरवून एका गिर- एक मजूर म्हणून जाऊं लागला. ज्या गिरणीत तो आज तागायत होता ! तेथेंच तो आपल्या अकलेनें, कष्टानें, आणि प्रामाणिकपणानें मजुरांचा मोकादम झाला होता ! आतां त्याला 'मजूर' म्हणून घेण्यां- तच भूषण वाटत असे. 'मजुरी कर म्हणणारा, त्याला गुरु आहे असें वाटे. आणि यांतूनच आपले सुखाचे दिवस दिसतील अशी त्याची खाली होती. तो बाबांच्याप्रमाणेंच अत्यंत महत्वाकांक्षी असे. आपण कुणी तरी मोठे झाले पाहिजे. आणि केव्हां तरी होणारच असें तो नेहमी म्हणे! आपण मोठे व्हावयाचें, आपल्याबरोबर, आपल्या स्नेह्या- सांवत्यांला, आप्त स्वकीयांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांला आपल्याचसारखें मोठे करायचे, तरच आपण मोठे झाल्याचे सार्थक ! अशी दादाची विचारसरणी असे. आम्हीं मुंबईला आलों, त्या वेळेपर्यंत बाबांनींच धरीं