पान:मजूर.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वें.


परिचय.


 आम्हांला मुंबईला येऊन पांच वर्षे झाली होती. आमचें मूळ गांव सातारा जिल्ह्यांत एक लहानसे खेडें आहे. तिथे आमचे वडील लहानाचे मोठे झाले. लग्नकार्ये होऊन आम्ही सारी मुलेही बाबांना त्याच खेड्यांत झालों. आमचे बाबा उभ्या जन्मांत आपलें खेडें सांडून कुठेही गेले नाहीत. त्यांनी एक खाजगी शाळा काढून ती चालविली होती. अजू- नही ती शाळा चालूच आहे. आतां म्हणे ती शाळा सरकारच्या स्वाधीन चालत असते. याच शाळेच्या जिवावर आमच्या बाबांनी आपला गरीबीचा संसार चालविला होता. बाबांच्या सहवासांत आईने कितीतरी दुःखा- सुखाचे उन्हाळे पावसाळे पाहिले होते. बाबांचा स्वभाव मनमिळाऊ व महत्वाकांक्षी असे. आई त्यांच्या अनुरूप त्यांना मिळाली होती. गरबति समाधानानें, टापटिपीने आणि बाबांच्या स्वभावाचा कल संभाळून राह्यचें कसें हें आईला उत्तम प्रकाराने कळून चुकलें होतें. म्हणूनच बाबांनीं प्रपंच चालवून, आला गेला संभाळून, आईचीं बाळंतपणे, सगळ्यांची दुखणीबाणी काढून थोडीशी जमीन खरेदी केली. आमच्या दादाला मॅट्रिक होईपर्यंत पुण्याला शिकायला ठेवलें. आणखी त्यांच्या मनांतून आपल्या हयातीत पुष्कळ गोष्टी करावयाच्या होत्या. आणि जगते वाचते तर त्यांनी केल्या पण असत्या ! तसें त्याचें वयही झाले नव्हतें ! एन्फ्ल्यु- एन्झाची राक्षसी साथ आली, आणि त्या सांथीने आमच्या बाबांचा बळी घेतला ! त्यांच्या इच्छा, महत्वाकांक्षा, साऱ्या जागच्याजागीं राहिल्या. आम्हीं अनाथ, पोरकी झालों. बाबांनी घेतलेली जमीन आमच्या तीन पोटाला पुरेशी नव्हती ! तिची डागडुजी व्हावयाची होती. शिवाय ती पाण्याखालची नव्हती. तिच्यांत वीहीर वगैरे असती, तर तिच्यांत बागायत चांगल्या प्रकारची होऊन आमच्या कुटुंबाचा गरीबीचा चरितार्थ सुखासमाधानाने चालण्यासारखा होता ! पण आज तशी