पान:मजूर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८

मजूर

 बबुताईला थोडीशी शंका येऊन तिनें दादाला विचारलें: – "संतु- दादा, आपली अर्धीगी कुठे आहे ? — "
 “माझी अर्धीगी माझ्या भावी श्वरांच्या घरीं ! — माझ्या लग्नाचें पुष्कळ -ह्मणजे अर्धे तरी जुळलें आहे ! ह्मणजे लग्नाची अर्धी तयारी - मी, वर-तयार आहे ! वधूचें जमले कीं, झालेच शुभमंगल समजा ! "
 " तशीच सुगंधाताईंच्या लग्नाची पण कांहीं तरी व्यवस्था केलीच असेल ! " बब्रूताई हैं विचारतांना हंसत होती, आणि आपल्याला आणखी हंसावयाला लागणार, म्हणून अपेक्षाही बाळगीत होती !---
 "ताईला काय १ कोणीही चिंतुछाप वानर आपला संसार थाटायला खुषीनें वधूदक्षिणा देऊन घेऊन जाईल ! त्याची नाहीं मला काळजी ! बाकी आम्हीं वधूदक्षिणा घेणार नाही आहों, नाहीं तर भलताच गैरसमज करून घ्याल ! -बरें आहे, बराच उशीर झाला आहे तुम्हाला खालीं तुमचा ड्रायवर तुमची वाट पाहून पाहून कंटाळून डुकल्या घेत असेल. तुमचा बहुत व अमूल्य वेळ घेतल्याबद्दल आम्हीं क्षमा करतों तुम्हांला -या म्हणजे जाच आतां !" आतां तर बबूताईची मुरकुंडी वळली " वा ! वा ! बरें येतें हं ! रत्नु- येऊं ना रे?..."
 "अहो नव्या ताई, मी येऊं का तुमच्या मोटारींतून ?" रत्नु उड्या मारीत मोंटारीकडे निघाला. पण तितक्यांत दादाचा डोळा मोठा झाले- ला पाहतांच जागच्याजागीं थबकला !-
 “ येतोस ? चल तर ! --नाहीं तर ताईबरोबर उद्यां परवां ये हं ! " बबूताई बोलत बोलत मोटारींत जाऊन बसली. मी दादा, पांचवायला खालींपर्यंत गेलो होतों.

 "सुगंधाताई, संतुदादा, तुमच्या इथें आलें, पण मला किती आनंद

झाला म्हणून सांगूं ? असा आनंद मी जन्मांत आजवर कधीं अनु- भवला नाहीं ! गरीचींत इतका आनंद असतो, याची मला कल्पनासुद्धां नव्हती ! गरीब झाल्यावर जर नित्य इतका आनंद मिळणार असेल, तर मी गरीच व्हायला एका पायावर तयार आहे !-खरेंच तुम्ही सगळे जण कित्ती-कित्ती चांगले बोलतां !—"