पान:मजूर.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ श्रीराम ॥

महाराष्ट्र - कुटुंब - माला.

गुणलुब्धाः स्वयमेव संपदः ।
उद्देश पत्रिका.

 महाराष्ट्र कुटुंबाचे सद्यः चित्र निरनिराळ्या बाजूंनीं कसें आहे, तें चित्र- पूर्वी कसें होतें; व पुढे कसें दिसावें, व असावे अशी जाणत्या महाराष्ट्रा- ची आशा व इच्छा आहे, हें मार्लेत येणाऱ्या निरनिराळ्या पुस्तकांतून 'आरशां'त पाहिल्याप्रमाणें दाखवावें, हा मालेचा प्रधान उद्देश ठेवण्यांत आला आहे. मार्लेतील प्रत्येक पुण्याचा कटाक्ष, महाराष्ट्र कुटुंबाची स्वस्थिति कशी आहे, व सुस्थिती कशी होईल हे दाखवितांना, कुटुंबांतील भेसूर, हिडीस, व विलक्षण विकृत स्वरूपाची यथातथ्य किंवा अवास्तव चर्चा करून किळस उत्पन्न होईल, असें दाखविण्यापेक्षां, होमीओपाथीच्या गोडी व गुणांत जशा गोळ्या असतात, त्याप्रमाणेंच निवड करण्याकडे असेल.
 जी मधली स्थिति नेहमीं श्रेष्ठ दर्जाचा समाज निर्माण करते, किंवा अवनतीचा खाडा गांठते, ती महाराष्ट्राची मधली स्थिती आज कशी आहे, ती दुसऱ्याच्या चुका दाखवून स्वतःकडे श्रेष्ठत्व घेऊन, अवन- तीचा अवलंब अधिक करीत आहे, कीं स्वतःच्याच चुका जाणून, असलेला आपला चांगला गुणांशवाढीस लावून श्रेष्ठ दर्जाचा मार्ग पत्करीत आहे, याबद्दलची वाङ्मयीक चर्चा कांदबरीद्वारा करावी, हेंही एक प्रस्तुत माचे वैशिष्ठ्य आहे.
 अत्युच्च कल्पनांच्या वातावरणांत भरमसाट भराया मारणें, किंवा आपल्याच असत्या नसत्या दुर्गुणांचा उकिरडा उकरीत बसणें, या दोहों- हूनही 'महाराष्ट्र कुटुंबा'ची जशी आहे तशी परिस्थिती उद्बोधक