पान:मजूर.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
मजूर

माझ्या फोडणीच्या लाह्या तयार झाल्या होत्या. तीन बशांत घालून बबूताई पुढें दादापुढें बशा ठेवल्या. मी माझ्यापुढें बशी घेतली. इतक्यांत बाहेर खेळत असलेला रत्नुही आला. त्याला थोड्याशा त्याच्या बशींत घातल्या. सगळ्यांनीं खायला सुरवात केली ! खातांना ' आणखी कांहीं तरी बोला हो ' म्हणून बबूताई दादाला म्हणाली.
 " ही आमच्या आईच्या कीर्तनाची खिरापत बरं का ! " दादा उद्गारला. बबूताईला खूप हंसूं आलें !
 लाह्या खायच्या झाल्यावर बबूताई जायला उठली ! पुष्कळ उशीर झाला होता. ती मला म्हणाली, "पुन्हां येईन की ! आतां आईच्या समा- चाराला नेहमीं येत जाईन !- पण आजपर्यंत तूं कांहीं कधीं आमच्याकडे आली नाहींस ! केव्हां येशील ? खरें म्हटलें तर मी तुला आज बालवा- यलाच आलें होतें. आमचा भाई माझा थोरला भाऊ- परवांच विला- यतेहून आला. त्याला भेटायला माझ्या सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या तूंच येवढी राहिली होतीस. तूं यावेंस असें त्या दिवसापासून मला सारखे वाटत होतें, पण तेव्हांपासून तुझी माझी गांठच नाहीं ! मग केव्हां येशील सांग ? मी मोटार घेऊन येईन न्यायला ! - संतुदादा, सुगंधाताईला घेऊन जायला आले तर पाठवून द्याल ना ?-"
 "हो, वाटेल तेव्हां ! माझें हो काय त्यांत जाणार ? चांगली तिला तुमच्या मोटारीतून मिरविण्याची ऐट तर माझ्याजवळ मारायला येऊ द्या कीं ? - " दादाने उत्तर दिलें !
 "बरें झालें. ताईच्यामुळे तुमची आज ओळख झाली ! फार आनंद झाला मला ! तुम्ही याल का आमच्या बंगल्यावर ! – ” बबूताईनें दादाला विचारलें.
 " नाहीं ! " दादाने साफ उत्तर दिलें.  " कां ? ” वाईट तोंड करून फिरून बबूताईनें विचारलें.
 "थोरापासुनि दूर दूर फिरतो लाजोनि वस्त्राविणें ! " दादानें ताला- सुरांत म्हटलें ! बबूताई यावर नुसतीच हंसली ! तिचें वाईट वाटणें कोठच्या कोठें मावळलें !