पान:मजूर.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

३५

असणार ! मजुर मुलें मजुरी मिळविण्यासाठी तशाच स्थितीत मातेला ठेऊन बाहेर पडली आहेत. " “ तिच्या मुली 'आईचा जीव ' भूकेनें, तहानेनें काळजीनें घाबरा झाला,म्हणून आपणही घाबरून जाऊन वेडेपणानें आपल्या मजूर भावाला शोधण्यासाठीं बाहेर पडल्या आहेत ! हिन्दभूमीचीं रत्नुसारखीं अज्ञान अर्भके वस्तुस्थितीचे ज्ञानच नसल्यामुळे खुशाल खेळतां खेळतां झोपी गेली आहेत ! " अगोदर भरपूर खायला प्यायला नाहीं, असलेलें खायला द्यायला जवळपास कुणी नाहीं ! हिन्दभातेच्या त्या वेळच्या नेत्रांत " आशा-निराशेची सारखी झटपट चालली आहे ! " " तोंच कुणी देवदूतिका हिन्दमातेच्या मुलाबाळांच्या पूर्वपुण्याईने निगडीत होऊन - प्रेमाच्या आशेला गुंतून हिन्दमातेला शेवटची घरघर लागाव- याचा वखत आला असतां अवतीर्ण झाली ! आणि ती मरत्या मातेची प्राणज्योत सतेज करण्याकरितां आपल्या हातांनीं खाऊं पिऊं घालूं लागली ! हिन्दूमातेला थोडथोडी हुशारी वाटू लागली ! ती एक एक शब्द बोलू लागली ! तितक्यांत तिचीं मजूर मुले मुली तिथें आल्या ! त्यांनी ते दृश्य पाहिलें ! त्या देवदूतिका आपल्या आईला जगवीत आहेत हैं पाहिल्यावर त्या मजूर मुलाला कोण आनंद झाला असेल ! त्याचें वर्णन करण्यास या वेळी माझे तोंड व हें वर्णन कोणी लिहील त्या वेळीं त्याची लेखणी असमर्थ असेल यांत नवल काय ? - वगैरे वगैरे ! "
 इतके बोलून दादा थोडा वेळ थांबला ! नंतर एकदम मोठ्यानें हंसला. त्यानें आह्मां सर्वांकडे एकदां पाहिलें ! तो माझ्या आईच्या, आणि बबूता- ईच्या नेत्रांतून सारख्या अश्रूधारा चालल्या होत्या ! थोडा वेळ जाऊं देऊन दादा म्हणाला " कां कसें काय वर्णन केलें ? -लेखिकेला जमेलसें केलें कीं नाहीं ? ”
 " याचें सप्रमाण व साधार उत्तर म्हणजे आमच्या तिघींच्या डोळ्यां- तील पाणचि देत नाहीं का ?" मी दादाला म्हणालें !
 " हेच निर्व्याज, निर्मल, दिव्य जीवन आईला जगवील, वांचवील, आणि आईसुद्धां सगळ्यांना सुखाचे आनंदाचे दिवस दाखवील !" बबू- ताईच्या तोंडून सहजोद्गार निघाले !

 " तथास्तु !"दादा म्हणाला !