पान:मजूर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४

मजूर

आणि आतां तर काय ? चकारही निघणें शक्य नव्हता. दादाच्या बोलण्यानें हलवून खुंटा बळकट झाला होता ! मी दादाचें बोलणें चालले असतांच चुलीजवळ जाऊन विस्तव चेतत्रायला लागलें होतें. बबूताईचें लक्ष दादाच्या बोलण्याकडे लागले होतें. दादा पुढे केव्हां बोलू लागेल, असें तिला झाले होतें ! गरीब काबाडकष्ट करणाऱ्या माणसांत अर्शी हंसत खेळत गंमतीच्या गोष्टी बोलत काळ कंठणारी माणसे असतील, याची तिला कल्पनाही नव्हती ! आणि असणार तरी कुठून ? गरीबी ही चीज काय असते ? गरीबांचीं घरें काय असतात- याची चौकशी तरी करण्याचें बबूताईसारख्या गर्भश्रीमंत मुलींना काय कारण ? तिनें गरीबाची स्थिती उभ्या आयुष्यांत आजच आमच्या इथे पाहिली होती ! आमच्या चिन्हा- डांत पाऊल घातल्यापासून सगळेच कांहीं नवीन नवल वाटत होतें. प्रत्येक गोष्ट ती लक्षपूर्वक पहात होती, ऐकत होती ! 'सुगंधाताई' आपली मैत्रिण गरीबींतली आहे, एवढेच तिला माहित. पण तिची प्रत्यक्ष गरीबी तिनें आज बिव्हार्डी येऊन डोळ्यांनी पाहिली होती. खर्चात् बबूताईला आज कल्पनेपेक्षां निराळ्या जगांत-स्वप्नसृष्टीतच वावरत आहोत, असें वाटत असले पाहिजे ! असो.
 मी फोडणीच्या लाह्या करण्यांत गुंतलें, रत्नु हा हटकेच खेळण्या- करितां सगळ्यांचा डोळा चुकवून दाराच्या बाहेर पडला. बहुताई दादा बोलण्याची वाट पहात त्याच्या तोंडाकडे पाहात राहिली होती. दादा बेफिकीरपणानें तोंडानें शीळ घालीत बसला होता. अखेर बबूताई- च्यानें रहावेना. दादाला बोलावयाला लावण्याकरितां ती म्हणाली " या खोलाचें वर्णन कसे केलें असतें तें सांगायचें राहिलेंच तितकें !"
 “ Oh yes ! मला वाटतं लाह्या खातां खातां ते वर्णन करायचं होतें ! आतां करतों. कांहीं हरकत नाहीं !-ताई, ऐकते आहेस ना ? ऐक, पण ऐकण्याच्या नादांत लाह्यांची फोडणी बिघडवूं नकोस हो !" असें म्हणून दादानें सांगायला सुरवात केली !
 " संतु मजुराच्या राहत्या खोलीत पाय ठेवतांच काय दिसलें ? तर हिन्दमातेची शोचनीय स्थिति ! संतुची आई हचि कोणी हिन्दमाता ! तिच्या जवळपास कोणी नाहीं ! मजुरांची माय ती ! तिच्याजवळ कोण