पान:मजूर.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

३३


 "तें कां ? - आणखी आमच्याच उसनवारीवर आपला लेखन संसार चालविणार वाटतें ? वा ! मग चांगलीच लेखिका होणार तूं ! आतांच्या- सारखं वर्णन माझ्यासारख्या कुणीही सामान्य माणसानें करावें. पण लेखिकेचें वर्णन यापेक्षां निराळे पाहिजे. निराळ्या रीतीने करतां आलें पाहिजे- दुसन्या प्रकाराने मी दाखवूं का करून ? पण मी तें तुला माझ्या परवानगीशिवाय तुझ्या डायरीत टिपून देणार नाहीं हं ! -याच स्थितचें चित्र लेखकाच्या लेखणीनें असें रेखाटतां येईल. – ”
 "अरे पण, " त्याला मध्येच थांबवून आई म्हणाली, "6 तुम्हीं सारेच बोलता आहात तर खरें पण नुसतेंच कसें बोलतां आहांत ! या आपल्या घरीं आल्या आहेत, सुगंधा बाहेरून भटकून दमून आली आहे, तूं आल्यापासून तसाच बसला आहेस ! तसेंच बोलायचें तें कांहीं तरी करून घेऊन ' खातखात ' बोलत बसा
 याला म्हणतात आईचं अंतःकरण ! आम्ही आपले चांगले नुसतें बोलतच राहिलों आहोत. पण बोलाचीच कढी बोलाचाच भात जेऊ-नीया तृत कोण झाला ? " ताई ऊठ ! चट्टदिशी नी कशा छानदारशा फोड- णीच्या लाह्या करतेस पाहू या ! करीत करीत तुला ऐकतां येईल. खात खात आम्हांला बोलतां येईल ! - लाह्याबरोबर आणखी कांहीं दुसरें करायचे असेल, तर तेंही कर ! आज माझा पगार झाला आहे ! आज आपण राजे - श्रीमंत - बादशहा आहोत ! पुढची पांच तारीख येईपर्यंत सबंध नाहीं तरी अर्धपोटीं चैनींत राहावयाला कुणाच्या देवालाही भिणार नाहीं ! - आणूंका आणखी कांहीं ? आज तर चैन करूं या ! - काय बबूताई, सुदामाच्या घरचे पोहे आवडतील कीं नाहीं ?- नाहीं तर आईनें खायचं नांव काढल्याबरोबर तुम्हीं आपल्या आमच्या ताईला म्हणायच्या " उशीर झाला बाई पुष्कळ ! जातें आतां मी ! - हो, गरी- बाच्या आईला तुम्हीं फळफळावळ आणून दिलें, तिची सेवाचाकरी केली-त्या गरीबांच्या घरी पोहे कसे घ्यायचे ? असे वाटायचें तुम्हांला !-” एवढें दादाचें व्याख्यान झाल्यावर बबूताई काय त्यावर बोलणार ! अगो- दर तिच्या मनांत असे आलें नव्हतें आलें असतें तरी ती बोलली नसती,
 म...३