पान:मजूर.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

३१


जागा चुकलों कीं काय ? कारण आमची ताई असा पोषाख कुटून कर- णार? पण मी गोंधळांत पडलेला पाहून-व तेवढ्यांत आईनें हा माझा मुलगा.' म्हणून बबूताईनी माझ्याचप्रमाणे गोंधळून जाऊं नये या करितां ओळख करून दिल्यावर बबूताईनींच मला थोडक्यांत पुष्कळ माहिती करून दिली. त्यांत आपली स्वारी अस्मादिकांना बोलवायला आमच्या हमालखान्याकडे चालती झाल्याचेंही बाहर आर्लेच !-बरें, पण आमचा इमालखाना सांपडला का तरी तुला ? "
 हो ! न सांपडायला काय झालें ? तुझी गिरणी झाली तरी ती मुंबईतच आहेना ? मनुष्याला तोंड असल्यावर दिल्लीला नाहीं का जातां येत? मग मुंबईतील गिरणी शोधायला काय कठीण ?- "मी म्हटलें!
 "अरेच्या ! बरीच शहाणी आहेस म्हणायची ! - बबूताई, पाहिलेत तुमच्या मैत्रिणीचे शहाणपण ? उगीच नाहीं, तिने मुंबईतील आमचा हमालखाना हुडकून काढला ? -बरें पण त्या हमालखान्यांत तुझा संतु- दादा भेटला का ? - " दादानेच विचारलें!
 " हो ! अगदी गेल्याबरोबर ! - " मी उत्तरलें !
 "हं ! मग तो काय म्हणाला ? " दादानें भिवया चढवीत विचारलें!
 तो म्हणाला की मी आतांच तुझ्यापुढे पगार हातीं घेऊन घरीं गेलों आहे ! " मी म्हटलें.
 शाबास ! तरी पण माझी बहिण आहेस ! होशील - होशील तयार होशील !"
 आम्हीं बोलत होतों, आणि बबूताई एकसारखी हंसत होती ! तिला आमच्या प्रत्येक बोलण्याची मौज वाटत होती ! मध्येच रत्नु दादाजव- ळून येऊन माझ्या मांडीवर बसला, आणि त्यानें बबूताईकडे बोट करून म्हटलें, ताई, या आमच्या नव्या ताई ना ? भारी चांगल्या आहेत या ! यांनी मला खाऊ दिला हो खाऊ दिला. आणि किनई तूं जसा माझा मुका घेतेस, तसा यांनी पण घेतला ! पण मी यांच्यावर -रागावलों नाहीं ! ताई ! आतां तूं एक माझा मुका घे ? - " म्हणून रत्नुनें आपले तोंड पुढे केलें. ही मध्येच उपस्थीत झालेली रत्नुची बाल लीला 'पाहून बबूताईला आनंदाश्रु लोटले ! आईला यावेळीं पुष्कळच बरें वाटत