पान:मजूर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
मजूर


 "खरेंच केव्हां आलीस तूं ? आम्हां गरबांच्या घरीं बरें यावेसें वाटलें?” मी दादाकडे पाहिलेच नाहीं !
 "आपण मुलुखगिरी करायला बिन्हाडाच्या बाहेर पडला, आणि त्या आल्याच पहा ! त्या येऊन चांगले तीन तास होऊन गेले ! - " पुन्हां दादा बोलला !
 "अरे बाळ, तिला कां बोलतोस ? मला जास्त घाबरल्यासारखें झालें, म्हणून मीच तुझ्याकडे बोलवायला तिला पाठविलें; म्हणून मी नाहीं का सागितलें ? " आईने सावकाशपणें बोलत माझी बाजू घेतली!
 तू गेलीस नी मी आलें. गेल्या आठ दिवसांत तूं शाळेला आली नाहींस. आपली गांठ पडली नाहीं. कां शाळेला येत नाहींस हेंहीं कळेना. मल्ल कांहीं चैन पडेना. म्हणून म्हटलें एकदां जावें तरी ! शाळा सुटली. माझी मोटर मला घ्यायला आलीच होती. मागें एकदां या बाजूनें मी जातांना तूं आपले बिन्हाड या बिल्डिंगमध्यें आहे म्हणून दाखविलें होतेंसच ! मोटर इकडून घ्यायला सांगीतलीं, नी तुला भेटायला वर आलें ! पण इथें येतें तो काय ? रत्नु त्या कोंप- यांत खेळताखेळतां तसाच जमीनीवर पडून झोपी गेला होता. आई मात्र दाराकडे डोळे लावून होत्या. त्यांना जरी बोलवलें नाहीं, तरी त्यांनी मला खुणेनें जवळ बोलाविलें. मी जवळ आल्यावर तुम्ही आमच्या सुगंधेची मैत्रिण कां ? म्हणून विचारलें, मी होय म्हटलें, मग त्यांनी बसायला सांगितलें. तूं साबूदाण्याची लापशी तशीच जवळ ठेऊन गेली होतीस. आईच्या मनांतून बोलायचे तर फार होतें. पण बोलायला शक्ति कुठें होती ? चुलीवरचें पाणी आणण्याकरितां त्या उठून तिथवर जाण्याची खटपट करूं लागल्या. पण माझ्या तें लक्षांत आल्यावर मी त्यांना उठू न देता मीच पाणी आणून दिलें. त्यांना 'लापशी'ही आग्र- हानें जाईल तशी खायला चमच्याचमच्याने घातली, नी पाणी दिलें. मग थोड्या वेळानें माझ्या मोटारडायव्हरला सांगून मार्केटांतून हीं फळे आणलीं- "
 "इतकें जो होत आहे, तोंच अस्मादिकांची स्वारी इथं थडकली. पहातों तों माझ्यापुढें हें दृश्य ! पहिल्यांदा तर मला वाटले मी माझी-