पान:मजूर.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.


दुःखांत सुख !

 “अरे वा ! बबूताई ! -अन् तूं इकडे कुणीकडे ? ”
 आमच्या बिन्हाडाच्या उंबरठ्यांत पाऊल टाकलें, नी आंत पाहतांच माझ्या तोंडांतून वरील उद्गार निघाले ! बबूताई माझ्या शाळेतील - क्लासांतील मैत्रीण होती. ती एका धनाढ्याची- श्रीमंताची मुलगी. ती आज आमच्या बिन्हार्डी. तेव्हां साहजीच मला आचंबा वाटला ! बबूताई आईच्या उशाशीं बसली असून संत्र्याची फांक आईच्या तोंडांत घाल- ण्याकरितां म्हणून तिनें हातांत घेतली होती. जवळच्या बशींत एक संतें तसेंच, एक फोडलेलें होतें ! संतुदादा पश्चिमेच्या खिडकीजवळ ट्रंकेवर हातपाय ताणून बसला होता. कामावरचे कपडे त्याच्या अंगावर नव्हते. . बदलेले होते. त्यावरून त्याला घरीं आल्याला बराच वेळ होऊन गेलेला. होता, हे उघडच आहे. रत्नु दादाच्या पाठीवर पडून बबूताईनें खारीक कीं काय दिली होती, ती चघळीत पडला होता ! आईच्या तोंडांत.. संत्र्याची पहिलीच फांक अजून घोळत होती. मला पाहतांच सगळ्यां- नाच बरें वाटलें. पण मला दादाकडे पाहण्याचे धाडसच होईना. मी.. आपली बबूताईला पाहतांच तिच्याशींच बोलावयाला सुरवात केली!
 बाहेरून आलेले पाय होते. म्हणून मोरीवर जाऊन धुतलें नी आईच्या दुसऱ्या बाजूस ज ऊन बसलें. आणि बबूताईला म्हटलें:-
 "खरेंच बबूताई, आज तूं इकडे कशी आलीस ? "
 "कशी म्हणजे मोटारींतून ! -खाली माझी मोटार नाहीं का उभी ?" बबूताई उत्तरली ! "अस्सं ! दरिद्र्यावर गंगाच लोटली म्हणायची ?"
 पण दरिद्री कसला वस्ताद ? गंगेचा लोट चुकवून आपण आपलें कोरडेच्या कोरडें दरिद्री राह्यचें म्हणून गंगेचा लोट येण्याच्या आधींच दरिद्री बाहेर पसार !-नाहीं बबूताई ? " दादानें संधी साधली