पान:मजूर.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
मजूर


 "मी उतरतों म्हटलें, पण आतां नाहीं उतरत. आतां उद्यां सकाळीं तुझ्या आईची प्रकृति पाह्यला मुद्दाम येईन ! संतुला सांगून ठेव ! - उशीर झाला आहे. जातों आतां ! " असें म्हणून गाडीवाल्यास गाडी हांकण्यास सांगितलें.
 मी तशीच माडीच्या पायऱ्या चढू लागलें ! मला बाहेर पडल्याला किती वेळ झाला होता ! बाहेर पडल्यापासून काय काय चमत्कार तरी दादा करितां गेले तों, दादा माझ्या अगोदर घरीं ! त्या दृष्टीनें माझा हेलपाटा फुकटच झाला होता ! - ' दादा काय म्हणेल ! आईची प्रकृति - कशी आहे ? एवढेच विचार माडीच्या शेवटच्या पायरीवर आले तेव्हां - मजजवळ शिल्लक राहिलें ! तशीच घाईघाईनें मी माझ्या दाराकडे वळलें !