पान:मजूर.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें

२७


 "सुगंधा ! छान ! छान ! फारच छान ! तुझे आईबाप मोठे रसिक असले पाहिजेत ! मग आमचा संच तेवढा कसा तुमच्यांत इतका अरसीक निघाला! मी तर म्हणतों, मी लवकरच गिरणीचा मालक होईन तेव्हां त्याला माझ्या गिरणीचा मॅनेजर करीन! माझ्या गिरणीच्या मॅने- जराची बहिण अशा दारिद्र्यांत ! अगदीच वेडा संतु ! बाकी लग्न लागलें तरी आपण सुगंधा हेंच नांव कायम ठेवणार ! आपल्याला आवडलें हें नांव ! - "
 जसा कांहीं याचा माझा वाङ्निश्चय होऊन सुद्धां गेला ! अधिका- राच्या तोऱ्यांत राहणाऱ्या माणसांचें नेहमीं असेंच असतें ! हाताखाल च्या कोणाहीबद्दल, आणि कसेंही बोललें तरी, त्यांत आपण कांहीं चूक करतों, असें त्यांना वाटतच नाहीं ! पुन्हां आपली बाजू सांवरून धरा- यला, ' माझें आपलें सरळ - स्पष्ट, बोलणें असतें ! मला वाटेल तें मी बोलत असतों ! दुसन्यासारखें आंत एक बाहेर दुसरें असें नसतें आमचें' - असें म्हणावयाची यांची तयारीच असावयाची ! असो. पण करायचें काय ? आपल्या बिन्हाडीं सोडीपर्यंत काय बोलेल तें ऐकून घेण्याशिवाय सुटका नव्हती ! शिवाय आतां जितक्या लवकर बिहार्डी जातां येईल, तितक्या लवकर जावयाला हवं होतंच.
 मॅनेजरची सारखी टकळी चाललीच होती. पण आतां विषय व आवाज जो एकदां बदलला तो बदलाच ! गाडी आली, आम्हीं दोघेही गाडीत बसलों गाडीवाल्याला 'घोबीतलाव' म्हणून सांगितलें. गाडी चालूं झाली. मॅनेजर खुशालचंद सारखी बडबड करीत होता. मी त्याला ' हूं' देखील म्हणत नव्हतें ! मोटारींतल्या गृहस्थाच्या वर्तनांत आणि या मॅने- जराच्या वर्तनांत काय फरक असावा, याची तुलना करण्यांत मन गुंतलें होतें ! दोघांनींही गाडींत बसविलें, दोघांच्याही गाडीत बसले.पण दोघांच्याबद्दल मी विचार करीत होतें. माझ्या विचाराच्या व खुशाल- चंद मॅनेजरांच्या बडबडण्याच्या भरांत गाडी धोबीतलावावर केव्हां आली मला कळलेंहीं नाहीं. गाडी थांबली. मी गाडीतून उतरलें. मॅनेजरा में तितक्यांत काय विचार केला कोण जाणें ! तो गाडीतून उतरला नाहीं. मला म्हणाला,