पान:मजूर.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें

२५


 "रजा आज पासूनच पाहिजे आहे आतांच पाहिजे !" मी म्हटलें.  "मग आज रजेला काय करायचे आहे ? आज गिरणीला अडीच वाजल्यापासून सुट्टीच आहे ! आज पे डे असल्यामुळे पगार करून सुट्टी दिली आहे ! " मॅनजरनी माहिती दिली.
 गिरणीला सुट्टी झाल्यावर दादा कशाला थांबेल ? तो केव्हांच गेला असेल. या पशूनें आडवे तिडवे बोलण्यांत वेळ घेतला, तो मी येतांच सांगितलें असतें तर ? - आतां इथे थांबून काय करायचे आहे ? दादा घरी देखील पोचला असेल. बरें झालं, आई जवळ कुणी नव्हतें. आम्हीं जाईपर्यंत. तो दादा अगोदरच गेला. पण आतां उशीर करून भागावयाचें नाहीं. आई नी दादा मला आणखी वेळ लागला तर जास्तच काळजी करीत बसतील ! मॅनेजराच्या ऑफिसांत थांबण्याचे कामच उरलें नाहीं. 'मी कांहीं न बोलतां मुकाट्यानें ऑफिसाच्या बाहेर पाय ठेविला. त्या बरोबर "अरे, मला न विचारतां निघालीस ? कांहीं रीतभात ठाऊक आहे कीं नाहीं ? बरें, तुझ्या भावाचे नांव नाहीं सांगितलेंस ? सांगून ठेव. मी तुझ्याबद्दल त्याला मुद्दाम विचारणार आहे ! काय तुझ्या भावाचें नांव ?"
 त्याला उत्तर द्यायची माझी मुळींच इच्छा नव्हती. पण नाहीं बोलले तर पशू आणखी कांहीं बाष्कळ बडबडायचा, म्हणून बोलणें भाग पडलें.- माझ्या भावाचें नांव संतूराम !”
 "कोण ? संतुराम - संतुराम ! - म्हणजे आमचा मोकदम - सुपर- वायझर का काय ? दॅट फेलो - यंग क्रीचर - संतु· शार्प अँड क्लेव्हर लॅड ! ओल्लो ! तो का तुझा भाऊ ? तूं का त्याची बहिण ? मग मूर्ख- मुली पहिल्यांदा कां नाहीं हें मला सांगितलेंस ? तूं आमच्या संतुरामाची बहिण, म्हणजे माझीच की ग तूं ? काय गद्धा आहे संतु ! तुझ्या सारखी त्याला बहिण असतांना त्याने मला कधीं सांगितले नाहीं ! खरोखरच मी म्हणतों तें उगीच नाहीं ! संतू गद्धा, अजागळ, पशू, पाषाण, बेअक्कल, वाटेल तें म्हटलें तरी त्याच्या बाबीत कमीच पडणार आहे ! मुली, माझ्या बोलण्याचा राग मानूं नको हं. मी आपला सरळ, आणि मनांत येईल तें बोलणारा आहे ! चार अपशब्द बोललो तरी त्यांत कांहीं अर्थ नाही समजलीस ! - तुझी आई अजारी असल्याबद्दल देखील कधीं संतू<br+>