पान:मजूर.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें.

२३


करितां मी माझ्या अधिकारांत मी ती गोष्ट कबूल करीन समजलीस १- यापेक्षां आणखी कांहीं तुला सांगायचे आहे का ?-"
 वरील मॅनेजराच्या निर्लजपणाच्या बोलण्याने मी जागच्याजागी थिजू- नच गेलें होतें. पण करायचे काय ? परिस्थितीनें मला तें निमूटपणें ऐकून घेणे भाग होतें, मॅनेजरच्या बाष्कळ बडबडीनें एक दोन घटकां- पूर्वी मनाला आलेला उल्हसितपणा पार मावळून गेला होता !
 या नंतर झाला यापेक्षां जास्त निर्लजपणा मॅनेजरच्या तोंडचा ऐका- यला नको म्हणून मी एकदम दादाची चौकशीच करणार होतें, तांच मॅनेजरचा इतका वेळ कुठे गेलेला बॉय आला. मॅनेजरचें लक्ष त्याच्या- कडे गेले.
 "साहेब मला हांक मारिली ? त्या ह्यानें मला सांगितलें. सोड्याच्या बाटल्या पोचवायला गेलों होतों-" मुलानें आपली कैफियत दिली.
 “बरें तर!” आपला कांहीं त्याच्यावर राग राहिला नाहीं, हें एवढ्याच शब्दानें मॅनेजरनें त्याला दाखविलें.
 "कांहीं काम आहे ? - " मजकडे पहात त्या मुलानें मालकाला विचारलें.
 "ही तुला मालकीण कशी काय शोभेल ? म्हणून तुला विचारायलाहांक मारिली होती ! - पहा हिला. मला बायको, तुला मालकीण आहे कीं नाहीं ठीक ? तिच्या दरिद्री खादीच्या फाटक्या कपडयाकडे पाहूं नकोस. उद्यां माझी झाल्यावर चांगल्या चुंगल्या कपड्यांनी पहा मग कशी चमकेल ?- सध्यां हिच्या नुसत्या रूपाकडेच पहा ! "
 असें म्हणून त्या मुलाकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने पहात मॅनेजर मिस्किलपणानें फिदीफिदी हंसूं लागला. या वेळीं त्याचा मला इतका संताप आला होता कीं, एक जाऊन माकडाच्या श्रीमुखांत भडकवावी ! पण ती वेळ नव्हती ! आणि त्याक्षणी माझ्याठिकाणीं तितकें त्राणही नव्हतें ! माझा चेहरा रागाने लाल झाला. या पुढे त्याला दुसरे तिसरेही मुळींच कांहीं न बोलू देतां एकदम त्याला विचारलें-
 "मी माझ्या भावाला बोलवायला आलें. घरी आमची आई अतीशय आजारी आहे. आत्तांच्याआतां माझ्या भावाला आजच्या दिवसापुरती