पान:मजूर.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
मजूर


जबाबदारी नसते, आणि आम्हीं तशी जबाबदारी घेतही नाहीं कुणाची ! मॅनेजरांनी आपलें वाक्पांडित्य सुरू केलें.
 बाकी आजकालचे मजूर तसे फारच फाजील आणि उनाड झाले आहेत. घरीं दारीं कुणाच्याच कह्यांत ते राहात नाहींत ! बेट्यांच्याकडून पगार न देतां चावसि तास चोपून काम करून घ्यायला पाहिजे ! बाकी तुझ्याजवळ हें बोलून काय करायचे ? - हं मग सांग, तूं इथें कां आलीस ? " तुझ्या भावाच्या संबंधानें
 "तशी कांहीं माझी तक्रार नाहीं. फक्त " मी त्याचें बोलणें तोडून बोलायला सुरवात केली, तर तितक्याच घाईनें मॅनेजरनें माझें बोलणे थांबविलें. व आपली चर्पटपंजरी सुरू केली. आतां याच्या भाष- णाला वळसा देऊन दादाबद्दलची चौकशी करणें, आणि त्याला ताबड- तोच घरी घेऊन जाणें, मुष्कीलीचे वाटू लागलें. मला थांबवून व जणुं काय मी पुढे काय बोलणार हे ओळखूनच त्यावर आपली मल्लीनाथी त्यानें चालू केली
 फक्त काय ? तुझ्या भावाबरोबर याच गिरणींत तुलाही काम पाहिजे ? आहेत, आमच्या गिरणीत बायकांही कामाला पुष्कळच आहेत. पण तुझ्या संबंधानें म्हणशील तर, तें कांहीं होईलसें दिसत नाहीं. आमच्या गिरणीत इतक्या बायका आहेत ना ? पण तुझ्या शपथ तुझ्या सारखी देखणी एक देखील बाई नाहीं ! अगोदर तुझा भाऊ, आणि तूं एकाच ठिकाणी काम करणार असल्याने कामापेक्षां बोलण्यांत जास्त वेळ काढाल. शिवाय तुझ्या सारखी देखणी पारेगी गिरणीत कामाला ठेविली, तर गिरणींतल्या एका तरी मनुष्याच्या हातून काम नीट होईल काय ? हातांतल्या कामाकडे दुर्लक्ष करून प्रत्येकजण तुझ्या सुन्दर रूपाकडेच पहात राहील! आणि अशा रीतीने गिरणीत कामाला ठेवायच्या माण- साची मी निवड करूं लागलों, तर आमची अक्कल गिरणी तेव्हांच मातीला मिळवील, नाहीं का ? तेव्हां तसें कांहीं आम्हांला कामाला ठेवता येणार नाहीं समजलीस ? त्यापेक्षां तुझ्या भावाला महिन्या काठीं चारदोन आणे देण्याबद्दल सांगत असलीस, तर तुझ्या भावाच्या कामाची इतकी किंमत नसली तरी, केवळ तुझ्या सारख्या सुन्दर तरुणीच्या शब्दां.