पान:मजूर.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें.

२१


लीस ! चल हो चालती ! - अरे अजून हलत नाहीं ! लोचट कुठली ! - बॉय, ए बॉय, या भिकारणीला हाकलून देरे ! "
 आतां बोलल्याशिवाय सोयच नव्हती ! मॅनेजराच्या बोलण्याचा शक्य तितका परिणाम मी माझ्या मनावर होऊ दिला नाहीं. निदान झाला तरी तो शक्य तितका करून तोंडावर दिसूं दिला नाहीं. मॅनेजरचा बॉय जवळपास नव्हता. तो येऊन मला बाहेर काढीपर्यंत मी ' काय कसें ' बोलायचें त्याची जुळवाजुळव करीत होतें. मॅनेजरनें आपल्या बॉयला हांका मारण्याचा सपाटाच लावला होता. बॉय लवकर येईना म्हणून बुटाचे पाय फरशीच्या जर्मनविर, आणि हाताच्या मुठी समोरच्या लांक- डाच्या टेबलावर आपटण्याचा त्याने उद्योग आरंभिला होता. बॉय लव. कर येत नाहींसा पाहून स्वारी स्वतःच जागेवरून उठली, पण जागेवरू- नच ओरडून म्हणाली:-
 ए भिकारणी होतेस कीं नाहीं चालती ? तुला ऐकायला तरी येतें आहे कीं नाहीं ? का वेडीविडी आहेस ? "
 "मी भिकारीण नाही !"
 "मग कोण आहेस ? - भिकारीण नाहीं म्हणे ! मॅनेजरने तोंड वांकडे केलें.
 "मी मजुराची बहिण आहे ! "
 मजुराची बहिण १ - बायको नाहींस का ? असशील बहिण ! मग ? इथे कशाला आली आहेस ? तुझा मजूर भाऊ आहे कुठे ? - " मॅनेजर जसजसा माझ्याकडे न्याहाळून पाहूं लागला. तसतसा एकेक प्रश्न जास्त जास्त करूं लागला, व 'जा, चालती हो' हे शब्द हलके हलके त्याच्या तोंडांतून येईनासे झाले ! त्याने आणखी तेंच विचारलें " कुठे आहे तुझा मजूर भाऊ !
 याच तुमच्या गिरणीत असतो !" मी माझा शांतपणा सोडलानव्हता !
 "बरें मग? त्याला भेटायचे आहे ? की त्याच्याबद्दल कांहीं तक्रार सांगायची आहे ? - त्यानें आपल्या पगाराचे पैसे दारूपाण्यांत खर्च केले. घरी आणले नाहीत, हें का तुला सांगायचे आहे ? पण त्याला आम्हीं काय करणार ? आम्हीं पगार दिला म्हणजे सुटलों. मग आमच्यावर