पान:मजूर.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर मजुरपक्षानें जसा सर्वांवर जय मिळविला आहे, तसाच लवकरच 'इच्छा- रामभाई मिल 'मध्ये आम्हीं मजूर या मॅनेजरच्या अधिकाराला पायाखाल तुडवून श्रेष्ठ होणार म्हणून, या बेट्यानें असा खेटरें मारल्यासारखा चेहरा केला आहे " अशा सारखेच कांहीं तरी चमत्कारिक उत्तर दिलें असतें. असो ! २० 20 अशा या तीन ठिकाणी वांकड्या, नोगांच्या माकडछाप मॅनेजरला आपण स्वरूपसुंदरच आहोत असे वाटत असे. जसा देह तसाच स्वभा वही आहे, असं दादा त्याचा विषय घरी निघाला असतां सांगे ! याच्या नकला, याची अधिकाराची ऐट, आवाज, वर्तन, या सर्वांची करम- णुकीकरितां सुट्टीच्या दिवशीं दादा नेहमीं सोंगें आणी. ती स्वारी प्रत्यक्ष मी आज पाहिली. पाहतांक्षणीं स्वरूपाविष्करण तर तंतोतंत पटलें. आतां स्वभावाचा मासला बोलण्याचालण्यावरून कळावयाचा होता. त्याचेही घोडा मैदान नव्हते ! संतुरामदादा वर्णन करतो तसे बाह्यांगांत तर आहे, हे पाहूनच मला आंतल्याआंत हंसूं आलें होतें !-— त्याने माझ्याकडे पाहण्यांत, आणि मी त्याच्याकडे पाहण्यांत असा वेळ चालला होता. मला बोलायचें भान राहिले नाहीं. आणि खुशालचंद मॅनेजरनेंही अजून बोलावयाला सुरवात केली नव्हती ! पण असे किती वेळ चालणार ? कुणीतरी बोलायला सुरवात करावयाला हवीच होती. मी माझ्या मनाची सांवरासांवर करून विचारणार तोंच मॅनेजरांच्या तोंडाची तोफ डागली जाणार असा रंग दिसूं लागला. त्यानें तोंडांतली सिगारेट दूर केली; माझ्याकडे रोख लावला. कपाळावरील आठ्यांचा नकाशा बदलला. तिरस्कार, तुच्छता, अधिकाराची घमेंड, निर्लज्जपणा, डौल इत्यादिकांच्या विकारांनी थोडा थोडा वेळ मॅनेजगंच्या मुखश्रीवर कसरत केली, आणि लगेच त्यापैकी कोणत्याशा एका विकारानें मॅनेज- रांच्या तोंडाची तोफ डागली ! तोफेच्या सरबत्तीबरोबर पुढील मुक्ताफळे माझ्या कानावर आदळली. ( ए भिकारणी, इथे कशाला उभी राहिली आहेस?- ही गिरणी आहे गिरणी ! इथें कांहीं माझें किंवा माझ्या बापजाद्याचें घर नाहीं, समज-