पान:मजूर.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
मजूर


असावा,' असे का वाटते ? याचा उलगडा कसा व्हावयाचा ! 'हा गृहस्थ कोण ! ' म्हणून दादाला तरी कसें विचारायचे ? त्यानें तरी त्याला कुठें पाहिला आहे ? असे विचारांचे हेलकावे चालले असतांच इच्छारामभाई मिलच्या मॅनेजरच्या दारांत मी जाऊन थडकलें. व हलकेच आंत डोकावून पाहिलें.
 मॅनेजर खुर्चीवर बसले असून हातांत कसलें तरी वर्तमान पत्र होतें, व त्याच्या वाचनाच्या नादांत ते गर्क असल्याचे मला दिसलें !
 मॅनजरचे ऑफिस गिरणीच्या मुख्य दरवाजाच्या आंतल्याच बाजूला होतें. नंतर बरेच मोठे मध्ये पटांगण असून पलिकडे प्रत्यक्ष गिरणीच्या इमारती होत्या. गिरणींतला घडधड खडखड आवाज दूरवर ऐकावयाला येत होता. पटांगणांतून इकडून तिकडे तिकडून इकडे माणसाची ये जा ' चाल- लीच होती. मॅनेजर मजकडे केव्हां पाहतील या विवंचनेत असतांच पटांगणांत वावरणाऱ्या माणसांकडे मी लक्ष लावून पहात होतें. हेतु इत- काच कीं न जाणों कामा निमित्त दादा फिरतांना दिसला, तर बरेंच झालें. मला पाहतांच तो होऊन इकडे येईल, व मॅनेजरला विचारण्याचा माझ्या- वरचा प्रसंग टळेल !
 बराच वेळ झाला तरी तसें कांहीं झालें नाहीं, मॅनेजरचे डोकेंही वर्त- मानपत्रांतून वर निघेना, ' आतां काय करावें ? ' असा मला प्रश्न पडला. आपल्या आगमनाची व अस्तित्वाची जाणीव कशी द्यावी हेंहीं मला समजेना ! हलकेच ऑफिसांत पाय ठेवला, व आंतल्याच बाजूला एक लांबलचक बांक होतें, त्याच्या एका टोकाशीं टेकलें, आणि मॅनेजर वर पाहण्याची वाट पाहू लागलें.
 देवाला माझी करुणा आली ! गिरणीचा भोंगा एकदम वाजूं लागला, त्यासरशी मॅनेजरच्या हातचें वर्तमानपत्र एका बाजूला सरलें; आणि ऑफिसांतल्या घड्याळाकडे मॅनेजरनें आपली दृष्टी वळविली, तों त्याला बांकावर बसलेली मी दिसल्यें !-
 मॅनेजरनें मजकडे पाहतांच मी बांकावर बसलें होतें ती उठून उभी राहिलें ! मॅनेजर साहेब किती तरी वेळ माझ्याकडे टक लावून हाते !