पान:मजूर.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रें.

१७


असतां, घाबरल्यास्थितीत वेडेपणाने आईला सोडून आलें. त्याबद्दल दादा काय म्हणेल ? - याच विचारांचा धुमाकूळ माझ्या डोक्यांत एक सारखा चालला होता. त्यांतच त्या गृहस्थानें माझ्याकरितां आपला वेळ कां मोडला ? आपल्या मोटारींत कां बसविलें ? मी कां बसलें ? मात्र त्यानें माझें नांव विचारलें नाहीं, मी त्याला त्याचें नांव विचारलें नाहीं. आतांपर्यंत यापूर्वी कधीही परस्परांची गांठ पडली नाहीं. या नंतरही पुढें कधीं गांठ पडण्याचा संभव व कारण नाहीं. मग त्यानें माझ्याशी असें वर्तन कां केलें ? त्यानें माणुसकी दाखविली. यापेक्षां जास्त कांहीं नाहीं. आणि त्याच्या वर्तनांत जास्त कांहीं असावें अशी मला तरी कां अपेक्षा असावी ? मोटारींतल्या माणसांतही माणुसकी असते, तेही मजु रांना माणसेच समजतात. इतकें त्या गृहस्थाच्या वर्तनावरून पटलें तरी पुष्कळ नाही का झालें ? खरोखरच पुष्कळ झालें, या विचारांनीं माझें समाधानही पण झालें. त्या मनुष्याच्या प्रेमळ वर्तनानें, प्रेमळ कटाक्षानें, माझ्या पूर्वग्रहदूषीत मनावर बराचसा चांगला, व निराळा प्रकाश पडला. आणि दादा नेहमी म्हणतो त्याप्रमाणें हे आपले दिवस सदैव असेच राहावयाचे नाहींत, यांत मला बरेचसे सत्य दिसूं लागलें ! हो, अकारण उपकार करण्यास प्रवृत्त होणारीं त्या माणसासारखी माणसें जर याच जगांत वावरताहेत. तर दादाचें म्हणणें खरें कां होणार नाहीं ?
 या विचारांनीं माझ्या मनाला उत्तेजकता आली. हुरूप आल्यासारखा झाला. आज मजसारख्या गरीबाला अचानक मोटारीत बसायला मिळाले होतें, म्हणून माझा मलाच आनंदही झाला होता; व त्याबरोबर आपल्या अधिकाराचे अतिक्रमण मोटारीत बसण्यानें आपल्याकडून झाल्यामुळे मनाला मधूनमधून कसेसेंही झाले होते. या प्रमाणें मानसाकाशांत ऊन्ह पाऊस सारखा चालू होता ! व पाय गिरणीच्या मॅनेजराच्या ऑफिसच्या अनु- रोधाने चालले होते !
 आतां मनाला एकच चुटपुट मधून मधून सतावीत होती. ती ही या भल्या माणसाला आपण पूर्वी कधीं पाहिलें नसतां हा चेहरा ओळ• खीचा कसा वाटला ? 'याला कुठे तरी केव्हां तरी पुष्कळ वेळां पाहिला
 म...२