पान:मजूर.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
मजूर


चांगली पंचवीस तीस पावलें गेल्यानंतर मोटरचा हॉर्न वाजला. तेव्हां मोटार निघून गेली असें माझ्या लक्षांत आलें. बिचारा इतका वेळ आमच्यावर आणखी कसे उपकार करावें या विचारांत गढला होता.. माझ्या कठोर वर्तनानें त्या उपकारकर्त्याचें मन खड्डही झाले असेल, त्याला वाईट वाटले असेल; कदाचित् माझ्या, व मी वर्णन केलेल्या दादाच्या स्वभावाच्या उर्मटपणाबद्दल- हो आमच्या स्वभावाला उर्मट- पणांतच त्यानें ढकललें असेल - त्याला रागही आला असेल. कांहीं झालें असो मी तेथून निसटलें खरी ! -
 वरील सांगितलेला प्रकार किती थोडक्या वेळांत घडून आला होता ! मला वर्णन करायला किती तरी त्या मानाने वेळ लागला आहे. प्रत्यक्ष प्रकार चालला असतां जणूं काय मी स्वप्नमय आयुष्यांतच वावरत होतें असें मला वाटलें ! आम्हीं बोलून चालून गरीब मजुरांच्यामोलाचीं माणसें, गाड्या, घोडे, मोटारी ही आम्हांकरितां नव्हतच मुळीं ! आम्हांला त्या कशा मिळणार ! आम्हीं त्यांत बसतो तरी कशाला ? आणि बस- वितो कोण ! मोटारींतून वावरणारा वर्ग धनिक - श्रीमंत-मजुरांचा तिर स्कार करणारा - मजुरांना पायाखाली तुडविण्यांतच आनंद मानणारा असा- वयाचा, अशीच माझी दृढ समजूत. मी दादाबरोबर मुंबईस आल्यापासून शाळेंत कित्येक गरीब, श्रीमंत माझ्या मैत्रिणी क्षाल्या होत्या मी सर्वाशी मैत्री ठेवी. पण श्रीमंत म्हटल्या की आपोआपच महा त्यांचा तिरस्कार वाटे. मी मनांतून त्यांची हेटाळणी करी. दादाच्या शिक- वणीनें ती हेटाळणी कधीं बाहेर दाखवीत नसे इतकेंच ! पण आज धनि- काबद्दल मला उलटा अनुभव आला होता ! मोटारींतून वावरणारा श्रीमंत असलाच पाहिजे. बरें जर श्रीमंत तर त्यानें आम्हां मजुरांच्या- बद्दल इतकी दया, इतकी सहानुभूति कां दाखवावी ? इतके श्रम व वेळ कां आमच्याकरितां खर्च करावीं ? याचा उलगडा माझा मला होईना ? दादाला हे सांगितलें तर त्याला काय वाटेल ? तो काय ह्मणेल? 'आईला सोडून तूं आलीसच कां ? ' असेंच म्हणून तो पहिल्यांदा मला वांकडे लावील, आणि रागवेल. मला त्याने अलिकडे शाळेला देखील जायची बंदी करून आईजवळ अष्टौप्रहर बसायला सांगितलें