पान:मजूर.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रे

१५


माझ्या डोळ्यांतून आपोआपच पाणी यावयाला लागलें. पण मी हें सांगतांच त्या सद्गृहस्थानें क्षणाचाही विलंब केला नाहीं. मोटार एकदम चालू केली ! मी रडत असतांना एकदांच त्या गृहस्थानें माझ्या कडे पाहिलें ! मीहि त्याच्याकडे पाहिलें ! त्या वेळीं उभयतांची दृष्टादृष्ट होतांच मला निराळाच अनुभव आला ! अंगांतून विजेचा झटका निघून गेल्या- सारखे झालें ! दया, प्रेम, अनुकंपा, सहानुभूतेि, हें सर्व त्या दृष्टींत एक- वटल्याचा मला भास झाला! खरेखुरें कांहींही असो, पण मला मात्र तसें वाटलें खरें! पुन्हां त्या गृहस्थानें मागें वळून पाहिलें नाहीं कीं, एक शब्दानें दुसरी कसली चौकशीही केली नाहीं. जरा वेळ गेला नाहीं तोंच मोटार थांबली ! गिरणीच्या समोर मोटार उभी राहिल्याचें माझ्या लक्षांत आलें ! ड्रायवरनें दार उघडले. मी खाली उतरलें. त्या सद्गृहस्थानें बोट करून गिरणीच्या मॅनेजरचें ऑफिस दाखविलें, आणि म्हटलें. “तिथें जाऊन मॅनेजरकडे चौकशी करा. म्हणजे ते तुमच्या भावाला भेटवतील, व घरीं जायला त्याला रजा पण देतील. मोटार तोपर्यंत मी येथेच उभी करितों. तुम्हांला व तुमच्या भावाला तुमच्या बिन्हाडीं नेऊन पोचवितों ! म्हणजे शक्य तितक्या लवकर तुमच्या आईला जाऊन भेटाल. आई पण काळजी करणार नाहीं ! "
 "नको ! नको ! खरेंच नको! मी दादाला घेऊन जाईन ! इतके उपकार आम्हीं गरीबांनीं आपले फेडायचे तरी कसे ? आपण खुशाल जा " मी एकदम म्हणाले.
 "उपकाराची भाषा बोलूं नका म्हणून मी म्हटलें आहे ना ? " तो गृहस्थ आर्जवून म्हणाला.
 होय खरे तें ! पण माझा दादा अगोदर आपल्या मोटारींत बसा- यचा नाहीं. मीच इथवर बसून आलें म्हणून तो माझ्यावर रागवेल. • आपल्या करितां दुसऱ्याला तसदी द्यायची नाहीं, असें त्याचें अगदीं सक्तीचें सांगणें असतें ! म्हणून म्हणतें ! जा आपण खुशाल ! देव तुमचें कल्याण करो !" इतकें म्हणून मी झटक्यानें मॅनेजरांच्या ऑफिसकडे पाय वळविलें. पुन्हां तो भला गृहस्थ आणखी उपकारांच्या ओझ्याखाली वाकवील, या भीतीनें मार्गे वळून देखील पाहिलें नाहीं.