पान:मजूर.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ मजूर (6 'काय ? तुमचा भाऊ 'इच्छारामभाई – मिल्स' मध्ये असतो ?” आश्चर्याने दोनतीन वेळां हाच प्रश्न त्यानें मला केला !” तिथें काय करतो तो ?' ! " मिलमध्ये माझा दादा नौकर आहे !" होय तें खरें ! पण त्याचा हुद्दा काय ?" 66 मजुराला हुद्दा असतो कीं नाहीं मला माहित नाहीं !." काय ? तुमचा भाऊ गिरणींत मजूर आहे ?" 66 66 'होय ! मजुरांचा मोकदम मोठा मजूर म्हणा वाटेल तर ! नाहीं तर हेंच नांव गोंडस दिसण्याकरितां 'सुपरवायझर' म्हणावें त्याला. ज्याला जसे आवडेल तसे त्याला सांगावें, असे माझा दादा नेहमी म्हणतो !" 66 “ अस्सें !" म्हणून तो सद्गृहस्थ मनापासून हंसला. त्याला काय वाटले कुणाला ठाऊक ! " बरें बसा तर खऱ्या मोटारींत ! तुमच्या मजुरमोकदम भावाला भेटायला, हा मोटारवाला मजूर घेऊन जातों आहे असे समजा ! बरें पण अशा अवेळी- उन्हांतान्हांत भावाला भेटा- यची इतकी काय जरूरी पडली होती ? त्याचा चालू कामाचा तुमच्या मेटण्यामुळे खोळंबा व्हावयाचा ! शिवाय तुम्हांला इतका त्रास ! - तुमची कांहीं हरकत नसली तर सांगा. नाहीं तर माझा कांहीं आग्रह नाहीं !" 66 A " तें सगळं मला माहित आहे !” मी मोटारींत चढत म्हटलें. एरव्हीं अशी उगीचच भेटायला दादाकडे गेले असतें, तर दादा देखील माझ्यावर रागावला असता ! म्हणून दादा इकडे कामाला घायला लागल्यापासून मी चुकून देखील इकडे आलें नाहीं. पण आज अगदीं निरुपाय झाला, यावेच लागलें !” " कां बरें ? आजच अशी काय येण्याची जरूर पडली !-११ “ आमची आई घरीं अथंरुणाला आज कित्येक दिवसांपासून खिळून आहे ! आज तिनें अगदींच धीर सोडला ! दादाला बोलावून घेऊन ये म्हणाली म्हणून आलें मी ! - घरी आईची काय स्थिति असेल कोण जाणें !- मला घरून निघाल्याला किती तरी वेळ झाला ! " हे सांगतांना