पान:मजूर.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ रें. दिशाभूल देखील झाली आहे ! कृपाकरून आतां माझं जर ऐकाल –" माझ्या चेहऱ्यावर काय फरक होतो हे पाहण्यासाठी मध्येच तो बोलतां बोलतां थांबला ! त्यावेळी माझें असें माझेंपण फारसें माझ्या- जवळ राहिलेंच नव्हतें. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. माझी त्याचें म्हणणे ऐकायला कारशी ना नाहीं, असें पाहून त्याने मला सांगितलें, " आपणांला कुठें जायचें आहे ते मला सांगा. म्हणजे मी माझ्या मोटारींतून आपल्याला त्या ठिकाणीं पोंचवितों ! संकोच करायचें कांहीं कारण नाहीं. मोटार तुमच्या भावाची आहे असे समजा !- कुठें जायचें आहे तुम्हांला ? —" " माझ्या भावाकडे ! " मी सांगितलें. 66 'बसा तर मोटारींत ! राहतां कुठे तुम्हीं ! १ धोबीतलावावर ! " 66 DP " धोबी नेऊन पोंचवितों ! ” " छे ! छे ! मला अगोदर धोबीतलावावर जायचें नाहीं. मी तिक- डूनच आतां आलें आहे ! मला माझ्या भावाकडे जायचें आहे. मला फक्त रस्ता दाखवा म्हणजे मी जाईन ! मला आपली मोटार काय करा- यची आहे ?-आम्हीं गरीब माणसें - " मी म्हटलें. वर ? बऱ्याच लांब राहतां ! कांहीं हरकत नाहीं. तिकडे " तें तूर्त राहूं द्या ! आपल्याला नुकतीच घेरी येऊन गेली आहे. अशक्तपणा वाढला आहे. आपला भाऊ कुठे असतो सांगा म्हणजे झालें !" त्याच्या या हुकुमी आवाजाने त्याच्या मोटारीत बसल्याखेरीज सुटकाच नाहीं, असे पक्के कळून चुकले. तोंडावर पाण्याचे हबकै मारल्यानें बराच गारवा आला होता, पाण्याचे थेंब तसेच तोंडावर सुकत चालले होते. केसही अस्ताव्यस्त झाले होते. पदरानें तोंड पुसले. केस सावरून नीटनेटके केले ! " सांगतां ना तुमचा भाऊ कुठे असतो तें- संकोच किंवा भति मुळीच बाळगूं नका, म्हणून एकदांच सांगितले आहे !" 66 माझा भाऊ 'इच्छारामभाई-मिल्स' मध्ये असतो. त्याच्याकडे जायचें आहे ?" मी सांगितलें !