पान:मजूर.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रे.

११

रस्त्यांतला एवढा मोठ। गोंगाट, जाणाऱ्या येणाऱ्या, ट्रॅम, मोटारीं, व्हिक्टोरिया, खटारें, बायसिकलीं, यांचीं आणि पायीं चालणारांचीही तशीच गर्दी; पण मला अगदी शून्यवत् वाटत होतें ! तो गोंगाट ती गर्दी, मला रंजवीत नव्हती, तशी त्रासही देत नव्हती. माझें शरीर संतुरामदादाच्या गिरणीकडे-दादाला बोलवायला चाललें होतें. आणि मन घरीं आजारी आईच्या सभोवती घिरट्या घालीत होतें. अशा स्थितीत सभोवतालच्या गर्दीची गंमत मला काय वाटणार ? एकादे वेळीं अति गर्दीमुळे थोडावेळ खोळंबायें लागलें, तर त्रासदायक मात्र होत असे. अखेर एके ठिकाणीं तसेंच झालें. कुठेसा विजेचा करंट एकाएकीं तुटल्यामुळें ट्रॅमगाड्या एकामागे एक अशा कितीतरी थांबल्या होत्या. त्यांच्या अड- थळ्यामुळे मोटारी, व्हिक्टोरिया, यालाही जायला वाट मिळणे कठीण झालें होतें, तर काय कसें ? म्हणून उगीचच चौकशी करणाऱ्या तमासगिरांचीही त्यांत भर पडली होती. त्यांतून मला आपला मार्ग काढणें मुष्कील झालें. तरीपण रेटीत रेटीत कसा तरी मार्ग काढलाच ! पण त्या श्रमानें मी अगदीच थकलें. घेरी आली. आणि त्याच घेरीत मी धाड्- दिशीं रस्त्याच्या बाजूस शेवटीं पडलें ! घेरी यायच्या वेळीं किंचित् शुद्ध होती. " आतां मला दादाची गिरणी कसची सांपडतें ? आणि आईची अवस्था – ” असेंच कांहींतरी अर्धवट विचार मनांत येत असतां घेरी आली. आणि स्मृति नष्ट झाली. त्या स्थितीत माझा वेळ किती गेला कोण जाणें ! पण जेव्हां मी शुद्धीवर येऊन डोळे उघडले, तेव्हां माझ्या पासून थोड्याशा अंतरावर एक मोटार उभी होती. मोटारींतीलच कोणी थोर मनुष्य माझ्याजवळ येऊन मला सावध करण्याचा प्रयत्न करीत होता. माझी ती स्थिती पाहण्यास तमासगिरांची गर्दी फारशी जरी नव्हती, तरी अगदीच नव्हती असें नाहीं. अगोदर फारशी गर्दी होण्यासारखी मुंबईची स्थितच नसतें. अगोदर रिकामा वेळ घालवायला तितका कोणाला वेळ असत नाहीं. त्यांतून माझ्याजवळ पूसतपास करणारा कोणीतरी समाजां- तला वरच्या दरज्याचा गृहस्थ होता ! मग तेथें दुसरे कोणी कसे माझी दैना पहावयास थांबणार ? असो. मी लवकरच डोळे उघडलेले पाहून मजजवळ उभा राहिलेल्या त्या गृहस्थास बरें वाटलें, असें दिसलें. त्याची