पान:मजूर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.

नव्हतें ! आम्हीं दरिद्री आहोत. याचें देखील आम्हीं मनाला तितकेसें लावून घेत नव्हतों ! पण अशा दरिद्री स्थितींत, आम्हीं सुखासमाधानानें रहात असतांही देवाला व देवाला पहावत नव्हते कीं काय कोण जाणें ! औषधाशिवाय आईला मृत्यू मारीत होता, माझ्या धाकट्या भावाला- लहान रत्नुला बालपणींच आईवांचून पोरका करित होता, मला, संतुराम- दादाला, लहान रत्नुला, प्रेमाची पाखर दूर करून, धनाच्या दारिद्याबरो- बर.मायेच्या माणसांचेंही दारिद्र्य भोगावयाला लावण्याचा दैवाचा क्रूर पण मला सहन होत नव्हता! आणि त्याचे अत्यंत वाईट वाटत होतें! त्यानें आमच्या शरीरांतील शक्ति नाहींशी होत होत चालली होती! ज्यांच्या करतां शरीर कष्ट करावयाला कुणी नाहीं, ज्यांच्या श्रमाचे चीज करायला प्रेमळ मनें नाहींत, ज्यांच्या कसल्याही संकटकाळांत धनावर अवलंबून अस- णारीं साधनें धनीकर्ता मिळवून देण्याचें मनांतही आणीत नाहींत, त्या आम्हां मजुरांचा जन्म तरी कशासाठीं ? देवा, आम्हांला असें जगवतोस तरी कशासाठी ? - हा माझा नित्याचा प्रश्न याही असल्यावेळीं माझ्या पुढें उभा होताच ! त्या प्रश्नाला बाजूला सारून मी गिरणी जवळ करण्याच्या उद्योगाला लागलें होतें ! वाटेंत पहिल्या भल्या शिपायाला विचारतांच त्याला सांगतां आला तितका शक्य तितका - गिरणीकडे जाणारा रस्ता त्यानं समजावून सांगितला. मी त्याचे आभार मानून त्यानें सांगित- लेल्या खाणाखुणा पहात झपाट्याने निघालें.