पान:मजूर.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२)

दुटप्पी की दुहेरी - ( लेखक:- गुरुवर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

प्रकाशक - गो. गो. अधिकारी, सारस्वत प्रसारक मंडळ पुणे शहर. ) गुरुव र्यांचें हें नूतनापत्य, कवि, कादंबरीकार, नाटककार, टीकाकार, निबंधकार, - किंबहुना काणांही सरस्वतीचा सेवक होऊं इच्छिणारांस गुरुस्थानीच शोभेल असे आहे. संपादक हरिहरराव, व संपादिका चंद्रिकाबाई — या मंडळींच्या संगतीत आपण असतांना ' वस्तुस्थिती ' च्या रखरखीत वाळवंटांत असला मंडळी आढळत नाहींत म्हणून मनाला हें Real नाही असे वाटून खिन्नता यावयाची, परंतु तसे न होतां, अशी मंडळी आपल्याकडे पुष्कळ असावी, आपणही तसे असावें- व्हावें इतकें वाटावयाला लावण्याचे सामर्थ्य हरघडी अम ल्याचा प्रत्यय यता. 'दुटप्पी की दुहेरी ' हा खरी कादंबरी नव्हे की खरी गोष्टही नव्ह- परंतु उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती कशी होईल, याची निरनिराळ्या अंगांची सूक्ष्म-भारदस्त चौकस, व्यापक चर्चा आहे. असे असले तरी ही चर्चा कादंबरी घाटांत बसविली आहे, गाष्टीच्या वेशांत नटांवली आहे. आणि सुभा. थित, विनोद, अलंकार, काव्य, कोट्या, कल्पना या सर्वांची अथपासून इि पर्यंत नुसती खैरात करून सांडली आह ! साहित्य संवेची शक्ति आपल्याजवळ उपजत असल्याचें ज्यांना समजलें आहे, व तत्प्रीत्यर्थ तपश्चर्या करण्याची ज्यांना इच्छा सवड, सामथ्य, व संकल्प आहे, त्यांनी दुटप्पी की दुहेरी अष्टौप्रहर हृदयाश, घट्ट धरले पाहिजे

सुनीतावलिः - ( लेखक व प्रकाशक:- गो. गो. अधिकारी, सारस्वत

प्रसारक मंडळ पुणे शहर.) सुनीत हा जो एक काव्य प्रकार मराठी काव्यांत आतां बरीच भवतीनभवती होऊन, आणि यथास्थित साधकबाधक चर्चा हाऊन दृढ- मूल होण्याच्या मार्गास लागला आहे, त्या 'सुनीत' विषयीं स्वमत प्रतिपाद- नाची साधार, युक्ति-जुक्ताला पटवून देण्यासारखी रा. गोपाळरावांनी सुन्दर प्रस्तावना जोडली असून सुनीताची' 'थिअरी' एकवास 'सुनीतें' लिहून ● प्रैक्टिकल' करून दाखनिली आहे. "रायगडावर काय आहे ?" तो अस्पृश्यमाला ताजमहाल आणि यमुना "एक स्मृती' 'मार्गप्रतिक्षा कास—' आणि ' मी आज निराशापुजतों ' हीं सुनातें विशेषन्त्र चटका लाव- णारी, तशींच ' सुनीत काव्यप्रकाराला दृढमूल करण्यास कारणीभूत होण्या सारखींच आहेत. 6 एक प्रसंग ' ' रसि- ,