पान:मजूर.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावंडांच्या भेटी.

कुलाब्याची दांडी - (लेखक प्रो. ना. सी. फडके एम्. ए. प्रकाशकः- विजय साहित्य माला, पुणे शहर ) “ कॉलेजांतले आयुष्यह्मणजे तरुण विद्यार्थ्यांच्या मार्गात कोणते धोके व त्यामुळे केवढा नाश होण्याचा संभव असतो, याचे नमुनेदार चित्रच हे पुस्तक आहे, असे पुस्तकांतीलच एका जबाबदार पात्राकडून कत्यांनी वदविले आहे. आणि ते अगदी खरें आहे, असें आमचें ठाम मत आहे. प्रो. फडक्यांनी आपल्या 'जगदीश' ला कॉलेज- लाईफ मधील मजेदार कहाणी सुन्दर रीतीनें सांगावयाला लावली आहे. कै. श्री. रमाबाई रानडे - ( हिंदमहिला पुस्तकमाला, पुष्प १ लें. लेखक उमाकांत. प्रकाशक, वि. प. नागपूरकर-हिंदमहिला कचेरी, मुंबई नं. ४) महाराष्ट्र-महिलांची आदर्शमूर्ति ह्मणजे कै. श्री. रमाबाई रानडे यांचें छोटे- कांही से त्रोटकच 'चरित्र' उमाकांतांनी आपल्या सरळ, सरस, आणि तळ- मळीच्या भाषेत रंगविलें आहे. श्री. उमाकांत यांनी कै. श्री. रमाबाई रानडे यांचें चरित्र लिहून महाराष्ट्र महिलांना, मुलगी, बहिण, जाऊ, नणंद, मैत्रिण, धनीण, सासू, आई कशी असावी, आपण तसें कसें व्हावें, याबद्दल विचार, उत्कंठा च कळकळ उत्पन्न करण्यास भाग पडेल अशी महत्वाची काम- गिरी बजावली आहे. या चरित्राचें सान्निध्य प्रत्येक स्त्रीस भूषणास्पद आहे, यांत मुळींच शंका नाहीं.

      • ..

गीत द्विदल - ( कवयित्री व कवि श्री. कमलाबाई देशपांडे, व श्री. यशवंत. ) श्री. कमलाबाई यांच्या कविता अंतःकरणाला चटका लावणाऱ्या आहेत, तरी त्यांतल्यात्यांत, ' बालकाकडे पाहून जीवितकोडें ' ' तल्लीनता' या नितांत रमणीय, खच्या जिव्हाळ्याच्या, आणि जिवंत उमाळ्याच्याच आहेत. श्री. कमलाबाई या एवढयाच कविता लिहून बसल्या तरी त्या श्रेष्टप्रतीच्या क्रवायत्री अजरामर म्हणून रहावयाला सर्वस्वी योग्य आहेत ! कवि यशवंत यांची कविता नवमतवादी, नवशब्द व कल्पनांची भूकेली, व सृष्टीसतीच्या सह- वासांत काल कंं इच्छिणारी, अशी दिसते. 'गीतद्विदला' च्या शुद्ध, सात्वांक, साध्या, रमणीय अंतरंगाला जरा विसंगतच असें पुस्तकाचे बाह्यांग वाटते ! अंतरंगींच्या साधेपणाला बाह्मांगाचा इतका भपका नसता तर चालले नसते का ?