पान:मजूर.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजूर

बबूताईनें आम्हांला हे दिवस दाखविले होते ! आईचा आशिर्वाद,

आणि शेटजींचे सद्धेतू पूर्ण फळास आले ! आमचें सर्व रीतीने मंगलच होत होतें !

अशाच एक दिवस सकाळी बागेतल्या बैठकीत, दादानें, स्वारीच्या

सहाय्यानें- सल्ल्यानें, आणि मदतीने आपल्या जन्मभूमीच्या जिल्ह्यांत-- सातारा जिल्ह्यांत - बबूताईच्या आईच्या नावची " आनंदी-शुगरामल " आणि स्वतःच्या वडिलांच्या नांवची त्यांच्या महत्वाकांक्षेचे द्योतक म्हणून -' विनायक -पेपर-मिल' काढून आपले कार्यक्षेत्र विस्तृत लवक- रच करणार असल्याबद्दल गोड हृद्गत आम्हां सर्वांना सांगितलें ! आम्हां सर्वांना दादाचें हृदगत् ऐकून अत्यंत आनंद झाला !! + + + +

प्रिय वाचक, बंधुभगीनी, आमची कहाणी आज इथेच संपली. या

नंतर दादाच्या 'आनंदी शुगरमिल' आणि 'विनायक पेपर मिल'च्या स्थापनेच्या भरभराटीच्या वाढीच्या, त्यावरील अडचणीच्या, आणि त्या सर्व वेळी आमची बबूताई दादाला कशी सहाय्यक झाली, आणि 'उद्योग, उत्साह, आत्मोन्नती, आणि आनंद' यांची कशी लयलूट केली, ही लवकरच सांगण्यासाठी भेटण्याचें अभिवचन देऊन आतां आपला सर्वांचा प्रेमाचा निरोप घेतें ! यत्कृतं यत्करिष्यामि तत्सर्वं न मया कृतं । त्वया कृतं तु फलभुक् त्वमेव मधुसूदन ||