पान:मजूर.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण २० वें

! “ तर ! यांत काय शंका आहे काय ! " ताईनें आपलें चरित्र लिहि ण्यासाठीच तर इतकें हैं घडून आलें ! मी फांसावर चढतां चढतां थांबलों कशासाठी १ ताईच्या चरित्र लेखनासाठी ? नाहीं तर ताईनें माझें चरित्र असे अपुरेंच कसे लिहिलें असतें ! बाकी, जगांत कसाही प्रसंग घडो, लेखकाच्या तो उपयोगीच ! आतां, आमची आई मेली, ती ताईच्या लेखनासाठीं, शेटजींचा खून झाला — गोष्ट वाईट खरी-- पण तेंही ताईला लेखनाकरितां उपयुक्तच ! मी फासांवर गेलों असतों, तरी ताईला पाहिजेच होतों- म्हणजे ताई, भलता अर्थ घेऊं नकोस !-लेख- काच्या दृष्टीने मी बोलतों आहे हें !- तसंच आपल्या या ऋणानुबंधनाची कादंबरी लिहावयाला तिला चांगलाच मसाला मिळाला आहे ! नाहीं- आपल्या खुशालचंदाला तर ताई चांगलीच रंगवील- आणि ती स्वतःला ही पण तशीच रंगवून घेणार आहे !" दादाच्या या बोलण्याने आम्ही सर्वत्र पोट घर-घरून हंसलों ! 66 66

पण ताई, " दादा किंचित् गंभीर होऊन म्हणाला तूं आपल्या

लिखाणाला नांव काय देणार आहेस ?" " तिनें 'विलक्षण योगायोग' असें नांव दिलें आहे " ताईनेंच सांगितलें ! “ छेः ! हें कसलें जुने पुराणें नांव ? – मला विचारलेंस तर मी सांगेन मलाच त्यांत 'नायक' केला आहेस ना? मग तुझ्या लिखाणाला नांव मी सांगतों - "मजूर" असें दे ! -- “ छान आहे हें नांव ! " ताईचा व तिकडचा एकच उद्गार आला ! रत्नू अशा वेळी आमच्यांत कर्धी बसावयाचा नाहीं. बागेत झाडा. फुलांतून हिंडत असायचा ! आम्हांला आतां अशा प्रत्यही सुन्दर काव्यमय नवजीवनमय, प्रातःकाळाचा लाभ होऊं लागला होता ! बबूताई — मी देहानें भिन्न पण मनानें एकच होतों ! दादा वस्वारी यांचेंही तसेच झालें होतें !