पान:मजूर.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजूर

झालें ! " तुमचें सारें Life मोठें क्युरअिसच झाले नाहीं ! तुमचें चरित्र तर लिहिण्यासारखें आहे ! " " मग लिहावयाचेंच आहे नाहीं तरी ! ताईनें लिहावयाला सुद्धां सुरवात केली आहे ! किती ग झाले आहे ? " बबूताईने माझ्याकडे वळून विचारलें ! अजून तुम्ही एकमेकींना पहिल्याच नांवानी हांका मारतां का ? वहिनी - वहिनी नाहीं का म्हणत ? " " तें जातच नाहीं ! भारी घोंटाळा होतो ! " बबूताईनें सांगितलें, 6 भाई. ताईच्या चरित्रांत, आपण सगळे येतो आहोत !” “ येणारच ! तुझें तर 'नायिका' म्हणूनच त्यांत महत्व असेल ! " तिकडून म्हणायचें झालें. “ यांत काय संशय ! " दादा म्हणाले ! " माझीं बहीण माझें चरित्र लिहिणार--म्हणजे मला नायक म्हणूनच रंगविणार ! अर्थात् 'श्रीमंत'च नायिका ! शिवाय त्यांत वावगेंही कांहीं नाहीं ! 'नायिकेची कार्ये यापेक्षां काय जास्त असतात ? ' नायिका' 'नायकासाठी आपला प्राण हरघडी धोक्यांत घालते आणि देते शेवटीं ! 'श्रीमंतां'नी तसेंच नाहीं का केलें ? त्यांनी आपला मजसारख्या मजुराच्या स्वाधीन आपला प्राण सुद्धां दिला ! 'ताई, या दृष्टीनें श्रीमंताच्या वर्णनांत उणेपणा ठेऊं नकोस अं! आमचें काय ? आम्हीं बोलून चालून मजूर ! " "हं ! श्रमिंत मजूर असा उल्लेख केला म्हणजे झालें ! " स्वारी उद्गारली ! "तें ही कांहीं चुकचें नाहीं. दादा बबूताईला श्रीमंत म्हटलेच नाहीं तरी ! " मी म्हटलें ! " हो, ताई, माझा दशभक्त म्हणून ठिकठिकाणी उल्लेख कर बरें का ? " "ताई, बाकी आपले म्हणजे खरें म्हटले तर आपणां सग- ळ्यांचेंच चरित्र लिहावयाला, आपण हे दिवस पाहिले म्हणूनच कांहीं तरीं हें झालें, नाहीं ताई ? बबूताई म्हणाली !