पान:मजूर.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १९ वे

याची कारणे मांडण्यांस सुरवात केली. त्यांचें पहिले बोलणें संपतांच सी. आय. डी. इन्स्पेक्टरांनी आपल्या जवळच्या कांही जिन्नसा बाहेर काढल्या- मजूर मंडळींतील आठदहा इसम एक बाजूस काढलें आणि स्वतः उभे राहून कोर्टाला सांगितलें. “ इच्छाररामभाई शेटजींचा खुनी संशयी म्हणून जरी संतुरामाला प्रथम पकडून अटक करण्यांत आली, तरी आतां आमच्या हातांत 'खरा' खुनीच पत्त्यामुद्यासह लागला आहे !" एवढे सांगतांच प्रेक्षकसमु- दायांत एकच खळबळाट उडाला ! ' मजुरांना आपला पुढारी सुटणार म्हणून जितका आनंद झाला, तितकीच उत्सुकता ' खराखुनी' कोण ?. ऐकण्याबद्दल, व पाहण्याबद्दलही वाढू लागली, 66 खरा खुनी-" इन्स्पेक्टर बोलू लागेल, " इच्छारामभाई मिल्स चे हे खुशालचंद मॅनेजर आहेत, अशी आमची पूर्ण खात्री झाली आहे. या बाबतीत, संतुरामाची बहिण, खुशालचंदाचा बॉय, त्यांच्याच गिरणीतले १०/१२ मजूर, यांना साक्षिदार म्हणून पुढे आणीत आहों. आणि आरोपीचीं कांही कृत्यें आणि भाषा, स्वतः मी पाहिली, व ऐकिलीही आहेत ! " ( खुशालचंद खुनी ! खुशालचंद खुनी ! संतुराम निर्दोषी ! संतुराम निर्दोषी! 'असा एकच गलगला झाला ! सायलेन्सरला शांत करतांकरतां नाकी नऊ आले. खुशालचंद काळा ठिक्कर पडला, त्याला इन्स्पेक्टरच्या ऑर्डरीने केव्हांच पोलिसांच्या ताब्यांत जावें लागले होतें ! झालें. केसचें स्वरूप सुरवातीस असे अचानक बदललें ! नंतर व्यव स्थितपणानें ‘खुशालचंदा'वर खटला भरण्यांत येऊन-दादाची सुटका त्याच दिवशी इन्स्पेक्टरसाहेबांनी कोर्टाकडूनच रीतसर करविली ! X X x आम्हां सर्वोला अत्यंत आनंद झाला ! दादा आमच्यांत येऊन मिस- ळला ! मजुरांनीं 'दादा'चा एकच जयजयकार केला ! मजूरपक्षांतील कित्येक कार्यकर्ती माणसें गर्दीतून पुढें घुसून दादाला येऊन भेटली. सर्वांनी दादाचें अभिनंदन केलें. दादाच्या सुटकेबद्दल मजूरपक्षांत ठिक-