पान:मजूर.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९०

मजूर

ठिकाण पानसुपाया, अभिनंदनार्थ जाहिरसभा, व्याख्यानें, यांची मारें • सर्व मुंबईत आठवडा दीड आठवडा झोड उहून राहिली ! निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून खटल्याविषयींची विविध मना रंजक हकीकत, दादाचें स्वागत, मजूरपक्षाचें अभिष्टचिंतन, यांनी कॉलमच्या कालम भरून जात होते. + + +

खुशालचंदच्या पुढील हकीकतीची आतां आपल्याला फारशी जरूरी

नाहीं. बॉय, मी, मजूर यांच्या साक्षी, रत्नुच्या हातांत मॅनेजरच्या शर्टचं सोन्याचें त्याचें नांव असलेले बटण, व स्वतः सो. आय. डी. इन्स्पे- क्टरनी स्वतः ऐकलेले पाहिलेले त्याचें घाणेरडें कृत्य - या सर्वांनी खुशाल- चंदाच्या बाबतींत जें योग्य तेंच केले इतकें सांगितलें म्हणजे पुरें ! + + + आतां भांडवलवाल्यानीं मजुरांच्या संपाचा निकाल जाहिर केला ! निकाल काय इच्छारामभाईनी दादाजवळ अगोदर सांगितला होता तोच होता. मजुरांच्या दोन अटी-पगारवाढ, आणि बोनस, या अटी मान्य करून कमी तासाच्या मापणीचा पुढे मागें लवकर विचार करूं म्हणून आश्वासनही मिळाले होनें !!! आणि मजुरांनी कामावर रुजू व्हावें; म्हणून सामोपचाराच्या भाषेत जाहीर झालें ! मजूर कामावर रुजूं व्हावयाला लागले असून गिरण्याच्या कामाची सुरवात अगदर्दी धूम- धडाक्याने व्हावयाला लागली !

लवकरच भाई मिलओनर्स - असोशिएशनचे अध्यक्ष झाल्याचें जाहिर

·झालें. दादाकडे अर्थातच भाईच्या कृपेनें म्हणा की, त्यांच्या आजवरच्या थोड्याच दिवसांतल्या पण अतिशय महत्त्वाच्या यशस्वी कार्यामुळे, म्हणा, की त्याच्या ठिकाणच्या उपजत हुशारीव्यामुळे समजा, बरीच गिर. ण्यांच्या सृष्टींत महत्त्वाची कामगिरी मिळाली. आम्हीं दत्तासाहेबांची जागा सोडून दिली. आणि बबुबाईच्या बंग- ल्यावरच राहावाला गेलों. बबूताई कांहीं केल्या ऐकेचना. आणि आम्हांला दुसरे ठिकाणी राहू देईना !