पान:मजूर.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८

मजूर

पुढे येऊन केसचें स्वरूप निश्चित व्हावयाचें हेंच आजच्या दिवसाचें काम ! दादाला आरोपीच्या पिंजऱ्यांत आणून उभे करण्यांत आलें. पहिलीच केस, दादाची निवालीं. चौकशीच्या सुरवातीलाच आम्हीं कोर्टात दाखल झालो होतो. गडबड एकसारखी चालली होती. हायको- र्टचा हेडसायलेन्सर " चॉप " शब्द उच्चारण्याची ड्यूटी व्यवस्थित- पणानें बजावीत होता. बॅरिस्टर बी. सदाशिवराव आपल्याजागी गेले, मी, बबूताई, भाई, आम्हांला दाखविलेल्या जागेवर जाऊन बसलों. खुशाल- दाला इन्स्पेक्टरसाहेघांनीं गिरफ्दार केल्यामुळे त्याचें तोंड उतरलें होतें. त्याला इनस्पेयटरसाहेबांनी जिथें बसावयाला सांगितलें होतें, तो तेथें बसला होता. त्याची कदाचित् ' अबलेवर बलत्कार करण्याच्या अपराधाकरि- तांच आपल्याला इन्स्पेक्टरसाहेबांठीं अशी तंबी दिली असावी, एवढेच तो समजत असेल, असे त्याच्या त्याही स्थितींत घमेंडखोर चेहऱ्यावरून, व दादाकडे पाहाण्याच्या त्याच्या तिरस्कारपूर्ण दृष्टीवरून कोणालाही वाटण्यासारखें होतें. 3 “" आतां काय होते ? " या कल्पनेनें बबूताईचा व माझा जीव खालींवर होत होता. दादाकडे आम्ही करुणापूर्ण नजरेने पहात होतों. दादा निश्चल, नि.वैंकार गंभीर दिसत होता! त्यांतच ताई 'दादा सुटणार' म्हणून मला धीर देण्याचा व स्वतःला घेण्याचा प्रयत्न करीत होते. सी. आय्. डी. च्या इन्स्पेक्टरसाहेबांची मुद्रा जरी। नेहमी - गंभीर - खोल चौकस खोंचक दिसावययाची, तशीच दिसत होती, म्हणावयाला हरकत नाहीं. पोलिस इन्स्पेक्टरांची ठरावीक धांवपळ चाललीच होती. मजुरांच्या जमा- वांत, त्वेष, उदासपणा, दुःख, इत्यादिकांच्या लाटा दृग्गोचर होत असत, तर इकडे भांडवलवाल्यांच्या जमावांत बेफिकीरी, उद्दामपणा, असल्याचा भास होत होता ! 'भाई'कडे सूक्ष्मपणे पाहिलें असतें, तर, 'संतूदादा' केव्हां आपण सुटलेला पहातों, असें त्याला झाले आहे असे . दिसले असते असो. कोर्ट येऊन स्थानापन्न होतांच चोहोकडे शांत झाले. कामाला सुर वात झाली. केस सुनावणला निघतांच पोलिस इन्स्पेक्टरांनी खुनाच्या वेळी सांपडलेले पिस्तूल पुढे आणिले, आणि संतुदादाच्याबद्दलच्या संश-