पान:मजूर.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.

म्हणून ? तुला ताईटली म्हटलें म्हणून ? तुझ्याबद्दल आईजवळ तक्रार केली म्हणून होय ? आतां तसें बोलणार नाहीं. तक्रार करणार नाहीं. अगदीं मुकाट्यानें आईजवळ तूं येईपर्यंत बसेन. पण तूं रडूं नकोस. तू रडायला लागलीस म्हणजे मी पण रडन !"
 रत्नुच्या या बोलण्यानें माझी काय स्थिती झाली असेल त्याची, ज्याची त्यानेंच कल्पना करावी. त्याचें वर्णन करणें माझ्या शक्तीच्या बाहेरचें काम आहे ! रत्नुला आईजवळ बसायला सांगितलें, नी संतुराम दादाला बोलावण्याकरितां त्याच्या गिरणीकडे निघण्यास तयार झाले. मी जायला उठले. इतक्यांत आईनें फिरून डोळे उघडले, आणि 'संतुराम बाळ आला का?' असा मजकडे पाहून क्षीण स्वरांत प्रश्न केला. 'ही मी दादाला' बोलवायलाच निघालें आहें. ताबडतोब घेऊन येतें त्याला. रत्नु तोंपर्यंत तुझ्याजवळ आहेच. पाणी हवं आहे का तुला ?
 " होय. तेंच मी मागणार होतें. "
 या वेळी एवढेही बोलणें आईला अगदीं संकटाचें वाटलें, मी पाण्याचा प्याला तिच्या तोंडाला लावला. तिनें सावकाशपणानें पाण्याचे दोन तीन घोट घेतले. नंतर पुरे म्हणून सांगितलें. " आणि लव- कर जा, जपून जा, संतुरामाला एकदम घाबरावयाला होईल, असें सांगूं नकोस. शांतपणानें त्याला घेऊन ये. माझ्याजवळ भगवद्गीतेची पोथी आणून ठेव. रत्नुला कांहीं खायला दिले नसलेंस तर खायला देऊन जा. तो भुकेजला असेल ! " आईनें सांगितलें तें मनःपूर्वक पण घाईनें उरकून मी अगोदर चाळीच्या बाहेर पडलें ! बिन्हाडा- च्या बाहेर पडतांना देवाला अनन्यभावानें नमस्कार केला, त्याची करुणा भाकली. माझा भाऊ संतुराम घरी येईपर्यंत तरी माझ्या आई- वर बरावाईट प्रसंग ओढवू नकोस, अशी त्याच्या जवळ याचना केली. आणि निघाले. पण जायचे कुठे ? मुंबईला येऊन पांच वर्षे झालीं खरी. पण दादा ज्या गिरणीत कामाला जातो, ती गिरणी कुठे आहे कशी आहे ? हें पाहिलें आहे कुणी ? आणि पाह्यचें कारण तरी काय ? - आपली शाळा, आपले बिन्हाड, आणि शाळेत झालेल्या दोन मैत्रिणीची बिन्हाडें ! एवढींच काय ती माझी मुंबई ! पण आज दादाची गिरणी शोधून काढण्याची