पान:मजूर.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १८ वे होतों—तसा, त्या दिवशीं (शेटजींच्या खुनाच्या रात्रीं) संतूच्या साथी- दारांनी मजुगंनी शेटजींच्या बंगल्याच्या बाहेर मला गराडा घातला होता तर गैरशुद्ध व्हावयाचा होतो म्हणूनच त्यांच्या हातून सामोपचारानेंच सुटलों ! पण शुद्धांत आल्यावर 'शेटजी आणि संतू' माझ्या पिस्तु लाला बळी पडले – तसेंच आतां मी पूर्ण गैरशुद्धांत आहे- -- या वेळीं तुला माझ्या इच्छेला बळी पडल्याशिवाय तुझी सुटका नाहीं !! माझ्या गैर- शुद्धीचा प्रभावच आहे हा !! आतां माझ्या आड कोण येणार आहे ? तुझ्यावर प्रेम करणारा बावळट बहाद्दर प्रेचचंद तुझ्या माझ्या लग्नानंतर माझ्यावर रागावेल - मला मॅनेजर ठेवणार नाही पण मी त्याचा कांटा त्याच्या बापासारखाच एक दिवस असाच बिनबोभाट सफाईनें काढून टाकीन !! समजलीस !! चल. फार उशीर झाला ! मला जास्त बोला. यला लावलेंस ! यापेक्षां भी जास्त गैरशुद्ध झालो म्हणजे आणखी भल- तेंच कांहीं- आणि याच वेळीं करीन !" असे म्हणून तो उलट्या काळ- जाचा सैतान माझ्याजवळ आला आणि त्याने माझा हात धरला ! निर्वाणीच्या पांडुरंगा धांव आतां ! " देवचें नांव या वेळींच मला न कळत आठवलें ! ! खरोखरीच निर्वाणीची वेळ ती !! आणि ती पांडु- रंगाला एकच माझी हांत पण ऐकावयाला गेली ! 68 त्या सैतानानें माझा हात धरला ! आणि दारावर कुणी जोरानें थाप मारली ! ! " कोण आहे ? " मॅनेजर चिडून माझा हात न सोडतांच ओरडला रत्तूला या वेळी कसें सुचलें कोण जाणें ! त्यानें धांवत जाऊन दाराची कड़ी आणि बोलट काढला ! आणि दार उघडलें तो दारांत बबूताई बॅरिस्टर प्रेमचंदभाई, पोलिस सी. आय. डी. इन्स्पेक्टर सर्व जण आंत आ ! खुशालचंदाने माझा हात सोडला ! त्याचा हात आपोआप गळूनच पडला ! " तुम्हीं माझ्या स्वाधिन झाले पाहिजे. " सी आय डी इन्स्पेक्टरनें ऑर्डर दिली ! मला कोर्टात नेण्याकरितां, बबूताई, भाई, बॅरिस्टर, वगैरे मंडळी मोटार