पान:मजूर.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर नसता - संतूने माझी मानहानी करून माईजवळ आपले वजन वाढविले नसतें, तर सुगंधा, तुझ्या भावावर आजच प्रसंग खात्रीनें आला नसता- मी आणला नसता ? मी: - काय म्हणतां ? काय सांगतां १- खुशालचंद – अगदर्दी खरें तेंच सांगतों ! आणि तें एवढ्याचसाठी कीं, यापुढे तू आपला हलकट हट्ट सोडून देऊन माझ्या इच्छेला मान द्यावास म्हणून ? –सुगंधा, आणखी ऐक ! माझ्या प्रत्येक लहानमोठ्या इच्छेच्या आड संतू आला, म्हणून जसें मी जन्माच्या मोलाचें प्रायश्चित संतूला भोगावें लागलें- तसेच, इच्छारामशेटजीनें, त्यांचा जन्मभर मी फायदा करून देत आलों असतांनाही – शेवटीं, संपाच्या वेळीं संतू- लाच मान दिला ! संतूजवळ माझी मानहानी केली - माझी मॅने- जरची जागा संतूला देऊ केली- मला पशूंत काढलें - मला पाडलें, संतूला चढवलें – त्याचें प्रायश्चित इच्छारामभाईला जागच्याजागीं मीं त्याच्यावर पिस्तूल झाडून द्यावयाला लावले आहे ! समजलीस ! माझ्या तावडीत सांपडतांच, एका पिस्तुलानें शेटजी, आणि संतू, यांना उड- विलें ! पुन्हां अशा शिताफीनें कीं, त्यांना पत्ता ना मुद्दा ! देव कांहींकरीत नाहीं - करणार नाहीं - केलेही नाहीं ! तुझ्या संतू, कायदा पर- स्परच आहे. फांसावर लटकावितो आज असा मी डेंजरस माणूस आहे ! पापाला वाचा फुटली होती ! भरभर पाप पापी कृत्यें ओकीत सुटलें होतें ! पण त्याचा उपयोग काय होता ? माझ्यापुढें - माझ्या बिहाडीं-- दाराला बोलट कडी लावून ते बाहेर येत होतें ! " आणि आतां जसा भी पूर्ण गैरशुद्धी आलों आहे ! तसाच त्यावेळी पिस्तूल झाडतांना पूर्ण गैरशुद्धतच होतों समजलीस ? त्याशिवाय त्या बंगल्याच्या अवघड ठिकाण चढतांच आले नसतें मला ! —कीं खिडकीबाहेर उभे राहतां आले नसतें ! कीं, गैरशुद्धत नसतों, तर शेटज'चे आणि संत्याचें बोलणे ऐकून चिडलों होतों तरी शेटजीवर ऐन- वेळीं पिस्तूल झाडून-तिथे अगदी संत्याच्या पायाजवळ पिस्तूल फेंकून बिनबोभाट-कोणी पाहण्याच्या आंत तिथून शुद्धीनें निसटतां आलें नसतें ! आतां जसा सुरवातीला शुद्धीवर आलों, म्हणूनच सामोपचारानें बोलत